गांधीनगर: आयफोन-निर्मात्या ॲपल इन्क.चे बदलत्या जागतिक व्यवसाय-चित्राला अनुसरून भारतातून उत्पादनात वाढ करण्याचा विचार करीत असून, सध्याच्या जागतिक उत्पादनात असलेला पाच ते सात टक्के वाटा हा पुढे जाऊन २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा कंपनीचा मानस आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. त्यामुळे जगात वापरात येणारा प्रत्येक चौथा आयफोन हा भारतातून तयार होऊन निर्यात झालेला असेल.

कायद्याने स्थापित नियम-कानू, पारदर्शक सरकारी धोरणे आणि व्यवसाय प्रारूपाचे भारतात अनुसरण केले जाते. ज्यामुळे ते परदेशी गुंतवणूकदारांसाठी एक पसंतीचे ठिकाण बनण्यास मदत झाली आहे, असे गोयल यांनी आवर्जून नमूद केले. भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयद्वारे आयोजित परिषदेेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. ॲपलने भारतात उत्पादित केलेली त्यांची सर्वात अलीकडील मॉडेल्सचे अनावरण भारतात करण्याची प्रथा सुरू केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

अर्थ मूव्हर्स यंत्रांच्या क्षेत्रातील आणखी एका परदेशी कंपनीचे उदाहरण देत गोयल म्हणाले की, भारताच्या उत्पादनाच्या स्पर्धात्मकतेमुळे ती कंपनी आता भारतातून परवडणाऱ्या आणि स्पर्धात्मक किमतीत उत्पादने घेत असून, ११० देशांना त्यांची उत्पादने पुरवत आहे आणि नवनवीन उत्पादनांचे अनावरण देखील करत आहे.

याच कार्यक्रमात बोलताना, दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, भारतात ॲपल आयफोन तयार करणाऱ्या सर्वात मोठ्या उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी झाली असून, हा प्रकल्प बेंगळूरुजवळ होसूर येथे येत आहे. या प्रकल्पातून सुमारे ६०,००० लोकांना रोजगार दिला जाईल, अशी त्यांनी माहिती दिली. भारतात सध्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मितीतील दिग्गज – फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्यांद्वारे निर्मित आयफोन तयार केले जातात.

जागतिक आर्थिक अनिश्चिततेबद्दल मत व्यक्त करताना, चालू वर्ष हे जगासाठी आव्हानात्मक असेल, असे गोयल यांनी नमूद केले. अनेक देशांमध्ये महागाई दर खूप जास्त आहे, परंतु अशा परिस्थितीतही भारताने किमती नियंत्रित केल्या आहेत. केंद्रातील विद्यमान सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत सरासरी ४.५ टक्के महागाई दर राहिला आहे, असे सांगून ते म्हणाले की, पूर्वी महागाई दर निरंतरपणे १०-१२ टक्क्यांच्या पातळीवर होता. विकसित अर्थव्यवस्था मंदावत चालल्या आहेत, तर त्याच वेळी मोदी सरकारने उचललेल्या पावलांमुळे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे, असे गोयल म्हणाले.