Rs 2000 Currency Note Exchange and Deposit Begins : गेल्या आठवड्यात शुक्रवारी (१९ मे २०२३) २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याची आरबीआयकडून घोषणा करण्यात आली. तसेच लोकांना त्यांच्या नोटा मंगळवारी २३ मेपासून बदलून मिळतील, असेही सांगण्यात आले. २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात नवीन नोटांच्या तुटवड्यामुळे जनतेला मोठा त्रास झाला होता आणि त्याच घटना आठवत सध्या अनेक प्रकारचे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

२००० रुपयांच्या नोटा बदलण्याशी संबंधित १२ मोठ्या प्रश्नांची उत्तरे

काही वर्षांपूर्वी नोटाबंदी करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांप्रमाणे २,००० रुपयांच्या नोटाही बंद झाल्या आहेत का…?

२००० रुपयांची नोट वितरणातून बाहेर काढण्यात आली आहे, परंतु तिचे चलन रद्द करण्यात आलेले नाही आणि २००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा असेल.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक
Chandrapur assembly Constituency congress candidate Praveen Padvekar
काँग्रेसने तिकीट दिले आणि वाऱ्यावर सोडले…आता दलित उमेदवार एकटाच……
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर

फक्त २००० रुपयांच्या १० नोटा म्हणजेच फक्त २०००० रुपयांच्या नोटा बदलता येतील का…?

आरबीआयच्या घोषणेनुसार, कोणतीही व्यक्ती बँकेच्या कोणत्याही शाखेतून एकाच वेळी २००० रुपयांच्या १० नोटांपेक्षा जास्त (म्हणजे २०००० रुपयांपेक्षा जास्त) नोटा बदलू शकत नाही, विशेष म्हणजे एकाच दिवसात एखादी व्यक्ती वारंवार काउंटरवर जाऊनही नोटा बदलून घेऊ शकते. म्हणजे जर एखादी व्यक्ती एका दिवसात १०-१२ वेळा रांगेत उभी राहून काउंटरवर पोहोचली, तर ती प्रत्येक वेळी १०-१० नोटा बदलू शकते. नोटा बदलण्याचे काम कोणीही अनेक दिवस करत राहू शकते.

आधीच्या नोटाबंदीप्रमाणे २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये फॉर्म भरावा लागेल का…?

२००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. २००० रुपयांची नोट बदलण्यासाठी बँकेत पोहोचणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा दाखवण्याची गरज नाही.

२००० रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी काही मर्यादा आहे का?

२००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी एका वेळी १० नोटांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, परंतु २००० रुपयांच्या नोटांच्या बाबतीत बँक खात्यात कितीही रक्कम जमा करता येईल आणि त्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र, बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याबाबत आधीपासून असलेले नियम पाळावे लागतील.

२००० रुपयांची नोट आता कायदेशीर निविदा आहे आणि ती खरेदी किंवा पेमेंटसाठी वापरली जाऊ शकते…?

आरबीआयच्या घोषणेनुसार, २००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा आहे आणि तशीच राहील. म्हणजेच याद्वारे कोणतीही खरेदी किंवा पेमेंट करता येते.

माझे बँक खाते नसल्यास मी २००० रुपयांच्या नोटा बदलू शकतो का?

होय…, बँक खाते नसतानाही कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा बदलता येतील.

२०००च्या नोटा फक्त त्याच बँकेच्या शाखेत बदलता येतील का? जिथे तुमचे खाते आहे…?

नाही…, २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकता आणि नोटा बदलू शकता.

ज्येष्ठ नागरिक २००० रुपयांच्या १० पेक्षा जास्त नोटा बदलू शकतात का…?

नाही…, ज्येष्ठ नागरिकांना २००० रुपयांच्या १० नोटा एकावेळी बदलण्याची परवानगी आहे. इतरांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठी या नोटा बदलण्याऐवजी खात्यात जमा करण्याच्या बाबतीत मर्यादा नाही आणि कितीही नोटा बँक खात्यात जमा करता येतील.

बँकेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा कधीपर्यंत बदलता येतील…?

RBI ने आतापर्यंत केलेल्या घोषणेनुसार, आजपासून म्हणजे मंगळवार २३ मे २०२३ ते शनिवार ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा बदलता येतील.

बँक खात्यात २००० रुपयांच्या नोटा कधीपर्यंत जमा करता येणार…?

RBI ने आतापर्यंत केलेल्या घोषणेनुसार, आजपासून म्हणजेच मंगळवार २३ मे २०२३ ते शनिवार ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत २००० रुपयांच्या नोटा बँक खात्यांमध्ये जमा केल्या जाऊ शकतात.

२००० च्या बनावट नोटांचं काय होणार?

बँकेकडे कोणत्याही प्रकारे २००० रुपयांची बनावट नोट आढळल्यास बँक ती जप्त करेल. त्या नोटेचे कोणतेही मूल्य ग्राहकाला दिले जाणार नाही. ४ पेक्षा जास्त बनावट नोटा आढळून आल्यास बँक अधिकारी त्या नोटा पोलिसांच्या ताब्यात देतील. पोलीस त्या नोटांचा तपास करतील. बँक नोट सॉर्टिंग मशिन्सद्वारे (एनएसएम) नोटांची तपासणी करेल.

हेही वाचाः ”नरेंद्र मोदी २००० रुपयांच्या नोटा छापण्याच्या बाजूने नव्हते; इच्छा नसतानाही…,” पंतप्रधानांच्या माजी प्रधान सचिवाचा मोठा गौप्यस्फोट

२००० रुपयांची नोट का बंद झाली?

२००० ची नोट आरबीआयने चलनातून बाद केल्यानंतर ही नोट का बंद केली जात आहे, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे की, या नोटा बाजारात कमी वापरल्या गेल्यात. त्यांचे चलन बाकीच्या नोटांच्या तुलनेत कमी होते.

हेही वाचाः ना आधारची झंझट, ना कागदपत्रांची कटकट; SBI नंतर आता ‘या’ बँकेत २००० रुपयांच्या नोटा सहज बदलता येणार

घरात राहूनही नोट बदलता येणार का?

तुम्ही घरी बसूनही नोटा बदलू शकता. जर तुम्हाला बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल, तर तुम्ही घरी बसून नोटा बदलून घेऊ शकता. बँक मित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्ही दररोज ४००० म्हणजे २००० रुपयांच्या दोनच नोटा बदलू शकता.