नवी दिल्ली : एअर इंडिया समूहाच्या विमान ताफ्यात वाढ होऊन ते सध्या ३०० विमानांवर पोहोचले असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ३१२ मार्गांवर सेवेसह, आठवड्याला होणारी उड्डाणे ८,५०० वर जाणे अपेक्षित आहे.

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये ‘विस्तारा’चे विलीनीकरण मंगळवारी पूर्णत्वाला गेले आहे. एअर इंडियाकडे मोठ्या आकाराची ६७ विमाने असून, त्यातील सात ‘विस्तारा’ची आहेत. एअर इंडिया आणि विस्तारा एकत्रित आल्याने ही देशातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणारी आणि देशांतर्गत दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी विमान कंपनी बनली आहे. विलिनीकरणापूर्वी एअर इंडियाकडे एकूण २१० विमाने, ९१ ठिकाणे आणि १७४ मार्गांवर सेवा दिली जात असून, आठवड्याला ५,६०० विमानांची उड्डाणे सुरू आहेत.

Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश

हेही वाचा >>> कारखानदारी क्षेत्राचे ऑगस्टमधील उणे स्थितीतून सकारात्मक वळण , सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.१ टक्क्यांची वाढ

एअर इंडिया एक्स्प्रेसची मालकी टाटा समूहाकडे आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये एआयएक्स कनेक्टचे विलीनीकरण १ ऑक्टोबरला झाले. एअर इंडियाकडे ८० छोटी आणि ६० मोठी विमाने, विस्ताराकडे ६३ छोटी आणि ७ मोठी विमाने आहेत. याच वेळी एअर इंडिया एक्स्प्रेसकडे ९० छोटी विमाने आहेत. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात आता एकूण ३०० विमाने झाली असून, १०३ ठिकाणी सेवा दिली जात आहे. त्यात ५५ देशांतर्गत आणि ४८ आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे.

सध्या संपूर्ण एअर-इंडिया समूहाकडून ३१२ मार्गांवर सेवा दिली जात असून, त्यात १६० देशांतर्गत आणि १५२ आंतरराष्ट्रीय मार्गांचा समावेश आहे.

एअर इंडिया समूहाकडील विमाने

एअर इंडिया – १४०

विस्तारा – ७०

एअर इंडिया एक्स्प्रेस – ९०

एकूण – ३००

देशांतर्गत मार्ग – १६०

आंतरराष्ट्रीय मार्ग – १५२

आठवड्याला उड्डाणे – ८,५००