Aadhaar-Ration Card Linking Last Date : रेशन कार्ड आणि आधार कार्ड सध्याच्या घडीला महत्त्वाचे दस्तावेज आहेत, त्यामुळेच सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) २०१३ नुसार, रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे, ज्यामुळे पात्र कुटुंबाला अनुदानित दरात धान्य खरेदीचा लाभ मिळतो. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले होते. रेशनकार्ड आणि आधारकार्ड हे दोन्ही सरकारद्वारे जारी केलेले महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. लोकांच्या सोयीसाठी सरकारने ही दोन कार्डे लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.

शेवटची तारीख काय?

जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल, ज्यांनी अद्याप त्यांचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नाही, तर सरकारने तुम्हाला एक शेवटची संधी दिली आहे. खरं तर सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ होती.

Kangana Ranaut
Kangana Ranaut : कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून कंगना रणौत यांनी मागितली माफी; म्हणाल्या, “मी माझे शब्द…”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Odisha Police Constable Recruitment 2024: Registration for 1360 posts begins at odishapolice.gov.in
ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरती; १,३६० पदांसाठी अर्ज सुरू, ६९ हजारापर्यंत मिळणार पगार, अर्जप्रक्रिया जाणून घ्या
FATF report on India marathi news
भारताची प्रशंसा…दहशतवाद, भ्रष्टाचार रोखण्यात यश; ‘एफएटीएफ’चा अहवाल
cybercriminals india post fraud marathi news
विश्लेषण: सायबर गुन्हेगारांकडून ‘पोस्टल स्कॅम’चा वापर… काय आहे हा कुरिअर फसवणुकीचा नवा प्रकार?
dr ajit ranade marathi news
डॉ. अजित रानडे यांना हटवण्याची प्रक्रिया ‘वेगवान’; प्रभारी कुलगुरूंचीही नियुक्ती
Presvu Eye Drops
अग्रलेख : दावा, दवा, दुआ!
Aadhaar Card Update Deadline is 14 September 2024
Aadhaar Card Update : १४ सप्टेंबरपर्यंत आधारकार्ड अपडेट करा नाहीतर भरावा लागेल इतका दंड; जाणून घ्या ,आधार कार्ड ऑनलाईन कसे अपडेट करावे?

आधार आणि रेशन कार्ड कोणी जोडणे आवश्यक?

जे लोक अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. सरकारला दोन्ही कार्डे लिंक करायची आहेत, जेणेकरून लोकांना एकापेक्षा जास्त शिधापत्रिका घेण्यापासून रोखता येईल आणि गरिबांची ओळख पटवून रेशन सहज पोहोचवता येईल. जर तुम्ही वेळेत रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले तर तुम्हाला त्यासाठी एक रुपयाही देण्याची गरज नाही. लिंक करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या शिधावाटप कार्यालयात जावे लागेल.

हेही वाचाः Money Mantra : वैयक्तिक कर्जाचे फायदे आणि तोटे काय? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

घर बसल्याही लिंक करता येणार

जर तुम्ही आता दोन्ही कार्ड लिंक करण्याचा विचार करत असाल तर ते तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सहज करू शकता. लिंक करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाइट food.wb.gov.in वर जावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक तपशील जसे की, आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. तपशील भरल्यानंतर तुम्ही ‘continue’वर क्लिक करा, त्यानंतर तुम्ही दिलेल्या नंबरवर एक OTP येईल, जो तुम्हाला भरावा करावा लागेल. तुमचा ओटीपी कन्फर्म झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक केले जाईल.

हेही वाचाः क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! RBI आता ‘हा’ नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार?

रेशन कार्डचे फायदे काय?

रेशन दुकानातून अन्नधान्य सवलतीच्या दरात उपलब्ध असते.
रेशनकार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र आहे, कारण ते सरकारद्वारे जारी केले जाते.
पॅनकार्डसाठी अर्ज करताना हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येतो.
रेशन कार्डचा वापर बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो.
हे कार्ड नवीन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी वापरले जाते.
या कार्डद्वारे तुम्ही मोबाईल सिम कार्ड देखील खरेदी करू शकता.
तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी देखील हे कार्ड वापरू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्ही हे कार्ड वापरू शकता.
नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी तुम्ही हे कार्ड वापरू शकता.