पीटीआय, नवी दिल्ली
ईवाय (अर्न्स्ट ॲण्ड यंग) या कंपनीत कार्यरत २६ वर्षीय सनदी लेखापाल तरुणी ॲना सॅबेस्टियन पेरायिल हिच्या कामाच्या अतिताणामुळे झालेल्या मृत्यूनंतर, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने देशभरात कथित असुरक्षित आणि शोषणयुक्त कामाच्या वातावरणाची चौकशी करण्याचे गुरुवारी संकेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ईवायच्या पुण्यातील कार्यालयात कार्यरत ॲना सॅबेस्टियनचा २० जुलै रोजी मृत्यू झाला. या संबंधाने केंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी गुरुवारी ‘एक्स’वर प्रतिक्रिया व्यक्त केली. कामगार मंत्रालयाने अधिकृतपणे या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि संपूर्ण न्यायाने निवाडा होईल यासाठी ते वचनबद्ध असल्याचे करंदलाजे यांनी ॲना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना स्पष्ट केले. कामाच्या ठिकाणी असुरक्षित आणि शोषण व ताणयुक्त वातावरणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू केली जाईल, असेही संकेत त्यांनी दिले.

हेही वाचा : विकसित भारतासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची ,अर्थमंत्री

ईवायने बुधवारी यासंबंधाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना एक निवेदन प्रसिद्धीस दिले. ॲना सॅबेस्टियन यांचा मृत्यू दु:खद असल्याचे नमूद करताना, कंपनी कुटुंबीयांच्या संपर्कात असून, त्यांना मदत करत असल्याचे त्यात नमूद केले आहे. परंतु ॲना यांचा जुलैमध्ये मृत्यू झाला असताना, कुटुंबाने कामाच्या अत्याधिक ताणाबद्दल कंपनीला तक्रार करण्याची, त्याबद्दल समाजमाध्यमांवर लिहिण्याची वेळ आता का निवडली, याबद्दलही कंपनीने प्रश्न केला आहे. देशभरातील कंपनीच्या सर्व कार्यालयांतील कार्यसंस्कृतीत सुधार आणि कर्मचाऱ्यांना निरोगी कार्यस्थळ प्रदान करण्याचे प्रयत्न कंपनी सुरू ठेवेल, असेही ईवायने निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : रिझर्व्ह बँकेकडून २०२४ मध्ये तरी व्याजदरकपात शक्य नाही : स्टेट बँक

सनदी लेखापाल (सीए) परीक्षा २०२३ मध्ये उत्तीर्ण केलेल्या ॲना सॅबेस्टियन पेरायिल यांनी मृत्यूपूर्वी चार महिने ईवाय पुणे कार्यालयात काम केले. चालू महिन्यात त्यांच्या आई अनिता सॅबेस्टियन यांनी ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना तक्रारवजा ई-मेल लिहून, त्यात अतिताणामुळे ॲनाचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.