Punjab And Sind Bank FD Rates : सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. या वाढीनंतर आता बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या एफडीवर २.८० टक्के ते ६.२५ टक्के व्याज देत आहे. बँक ४०० दिवसांच्या विशेष एफडीवर ७.१० टक्के, ५५५ दिवसांच्या एफडीवर ७.३५ टक्के आणि ६०१ दिवसांच्या एफडीवर ७ टक्के व्याज देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन व्याजदर २० एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. तुम्ही ऑनलाइन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन उच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकता.

FD व्याजदर काय आहेत?

७ दिवस ते ३० दिवस – २.८० %
३१ दिवसांपासून ४५ दिवसांपर्यंत – ३.००%
४६ दिवसांपासून ९० दिवसांपर्यंत – ४.६० टक्के
९१ दिवस ते १७९ दिवस – ४.७५%
१८० दिवस ते ३६४ दिवस – ६.००%
एक वर्ष ते ३९९ दिवस – ६.४० टक्के
४०० दिवसांच्या विशेष एफडीवर – ७.१० टक्के
४०१ दिवस ते ५५४ दिवस – ६.४०%
५५५ दिवसांची विशेष एफडी – ७.३५ टक्के
५५६ दिवस ते ६०० दिवस – ६.४०%
६०१ दिवसांच्या विशेष एफडीवर -७.०० टक्के
६०२ दिवसांपासून ते दोन वर्षांपर्यंत – ६.४० टक्के
दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी – ६.७५ टक्के
तीन वर्षांपासून ते १० वर्षे – ६.२५ टक्के

हेही वाचाः लॉकडाऊनमध्ये शिकला शेती अन् इंजिनीअरची नोकरी सोडून पोहोचला जपानला, आता वांगी पिकवून लाखो कमावतोय विघ्नेश

ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळेल

ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर बँकेकडून ०.५० टक्के व्याज दिले जात आहे आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ०.१५ टक्के व्याज दिले जात आहे.

हेही वाचाः रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने केले सन्मानित

बचत खात्यावरील व्याज

बँकेच्या वतीने एक कोटीपर्यंतच्या ठेवींवर २.८० टक्के, एक कोटी ते १०० कोटींपर्यंतच्या ठेवींवर २.९० टक्के, १०० कोटी ते ५०० कोटींपर्यंतच्या ठेवींवर ४.५० टक्के आणि ५०० ​​कोटींवरील ठेवींवर ५.०० टक्के व्याज देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fd rate hike punjab and sind bank fd rates govt bank raises interest rate big profits on 555 day fd vrd