FD vs PPF : एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर तो कोणत्या योजनेत गुंतवणूक करणार हे अवलंबून असते. मुदत ठेव (FD) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या दोन्ही योजना बचत आणि गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय ठरू शकतात. FD पूर्वनिर्धारित कालावधीसाठी निश्चित व्याजदर ऑफर करते, तर PPF मधील व्याजदर भारत सरकारने ठरवल्यानुसार बदलत राहतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दोन प्रकारच्या खात्यांमधील फरक लक्षात घेऊन गुंतवणूक करावी, कारण दोन्ही कर लाभ आणि तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळवण्याची संधी देऊ शकतात.

पीपीएफचे फायदे

PPF ही सरकारनं चालवलेली बचत योजना असल्याने अनेक फायदे मिळतात

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
EPF Pension Scheme Eligibility
EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

१) PPF मध्ये योगदान प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सीअंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे, ज्यामुळे तुम्हाला कर सवलत मिळते. याव्यतिरिक्त मिळवलेले व्याज आणि परिपक्व रक्कम करमुक्त आहे, ज्यामुळे तो एक आकर्षक करनिहाय पर्याय बनतो.

२)PPF ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, कारण ती गुंतवणूकदारांना सुरक्षिततेची भावना प्रदान करते.

३) PPF मध्ये ७ वर्षांचा लॉक-इन कालावधी आणि १५ वर्षांचा ठेव कालावधी मिळतो, ज्यामुळे तो दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय बनतो. सुरुवातीची १५ वर्षे संपल्यानंतर ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये एखादी व्यक्ती हे अनिश्चित काळासाठी सुरू ठेवू शकते, असे MyFundBazaar चे CEO आणि संस्थापक विनीत खंदारे यांनी मिंटला सांगितले.

४) PPF चा आणखी एक फायदा असा आहे की, ते आंशिक पैसे काढण्याची परवानगी देते आणि ७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्जाची सुविधा देते. आणीबाणी किंवा आर्थिक गरजांदरम्यान काही प्रमाणात तरलता देखील प्रदान करते.

५) पीपीएफ खाते दरवर्षी किमान ५०० रुपये आणि कमाल १,५०,००० रुपयांच्या गुंतवणुकीसह उघडता येते.

६) व्यक्ती १५ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्या PPF खात्यात वर्षातून किमान एकदा पैसे जमा करू शकतात.

us

दुसरीकडे एफडीचे स्वतःचे असे फायदे आहेत

एफडीचे फायदे

१) मुदत ठेवींना गुंतवणुकीसाठी १, ३, ५ वर्षे असा कालावधी उपलब्ध असतो, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या सर्व गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळणारी मुदत ठेव योजना निवडता येते.

२) फिक्स्ड डिपॉझिटवर लागू होणारे व्याजदर त्या व्यक्तीने ज्या दराने FD बुक केली आहे, त्याच दरावर स्थिर राहते. ते बाजारातील बदलांपासून स्वतंत्र असते. हे मॅच्युरिटीवर खात्रीशीर परताव्याची हमी देते. गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार एखादी व्यक्ती अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची एफडी निवडू शकते. हा कालावधी किमान सात दिवसांचा किंवा कमाल दहा वर्षांचा असू शकतो.

३) FDs निश्चित व्याज पेमेंटच्या स्वरूपात नियमित उत्पन्न प्रवाहदेखील प्रदान करते, जे दरमहा खात्यात पगार येणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरू शकतात. शिवाय FD सहज उपलब्ध असते आणि त्या विविध बँका आणि वित्तीय संस्थांसह उघडल्या जाऊ शकतात, ज्यामुळे तो सोयीस्कर गुंतवणूक पर्याय बनतो.

४) बहुतेक बँका वृद्ध लोकांना उच्च स्थिर व्याजदर देतात. परिणामी, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही जोखीम न घेता अधिक पैसे वाचवता येतात.

५) कर-बचत एफडी योजना प्राप्तिकर दायित्वे कमी करण्यात मदत करू शकतात. १९६१ च्या प्राप्तिकर कायद्याचे कलम ८० सी गुंतवणूकदारांना कमाल १,५०,००० रुपयांपर्यंत कर सवलतीचा दावा करण्याची परवानगी देते.

हेही वाचाः एमएस धोनीच्या सासू चालवतात तब्बल ८०० कोटींची कंपनी, साक्षीच्या आई शीला सिंह नेमक्या आहेत तरी कोण?

तुम्हाला एफडीवर मिळणारे व्याज कराच्या अधीन असते

तुम्हाला पीपीएफमध्ये कर-लाभ मिळत असताना तुम्हाला एफडीवर मिळणारे व्याज कराच्या अधीन असते. याव्यतिरिक्त FD परतावा नेहमीच महागाईवर मात करू शकत नाही, याचा अर्थ बचतीचे वास्तविक मूल्य कालांतराने कमी होऊ शकते. FD मधून मिळणाऱ्या संभाव्य परताव्याचे मूल्यमापन करताना महागाई लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच एफडीची सरकारकडून हमी दिली जात नाही, जरी ठेवी विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे प्रत्येक बँकेत ५ लाखांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरवला जातो.

पीपीएफ कर लाभ आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायासह दीर्घकालीन बचत शोधणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य आहे. दुसरीकडे FD अधिक लवचिकता आणि तरलता देतात, ज्यामुळे ते अशा व्यक्तींसाठी योग्य बनतात, ज्यांना त्यांच्या निधीची कमी कालावधीत आवश्यकता असू शकते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्या.

हेही वाचाः चीनच्या एमजी मोटार इंडियामध्ये जिंदाल ४८ टक्के हिस्सा विकत घेणार

पीपीएफचे नवे व्याजदर काय?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी दीर्घकालीन गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. PPF ७.१% व्याजदर देते. तर Axis Bank, State Bank of India आणि ICICI बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३% ते ७.१% पर्यंत व्याजदर देतात, तर HDFC बँक या ठेवींवर ३% ते ७.२५% पर्यंत व्याजदर ऑफर करते.