वृत्तसंस्था, न्यू यॉर्क

यंदा उन्हाळ्यात महागाईत घट झाली असल्याने मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाणार नाही. विकासाची गती मंदावत असल्याचे लक्षात आले तरच व्याजदरात वाढ होऊ शकते, असे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले.

Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता

अनिश्चितता आणि जोखीम यांचा विचार करून आम्ही काळजीपूर्वक वाटचाल करीत आहोत. मागील काही महिन्यांतील आकडेवारी पाहिल्यास महागाई स्थिर असून, रोजगारात वाढ होताना दिसत आहे. वित्तीय स्थितीमुळे सातत्याने बदल घडत आहेत. त्यामुळे त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागत आहे. पतधोरणावर त्याचे परिणाम होऊ शकतात, त्यामुळे काळजी घेतली जात आहे, असे पॉवेल यांनी सांगितले.

हेही वाचा… अदानी सिमेंटकडून ३.५ अब्ज डॉलरच्या कर्जाची पुनर्रचना

फेडरल रिझर्व्हच्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण महागाई मागील वर्षाच्या तुलनेत ३.५ टक्क्याने वाढेल. ऑगस्टमध्ये महागाईचा हाच दर होता. खाद्य व ऊर्जा पदार्थ वगळता मूलभूत वस्तूंची महागाई सप्टेंबरमध्ये ३.७ टक्क्यांनी वाढेल, असे पॉवेल यांनी नमूद केले.

हेही वाचा… आयपीओ’ प्रक्रियेला वेग; विद्यमान वर्षात ८०,००० कोटी रुपयांची निधी उभारणी शक्य

व्याजदरात पुन्हा वाढ करावयाची की ते सध्याच्या पातळीवर किती काळ ठेवायचे हे आगामी काळावर अवलंबून असेल. महागाई, रोजगार दर यांची आकडेवारी पाहून याबाबत निर्णय घेतला जाईल.- जेरोम पॉवेल, अध्यक्ष, फेडरल रिझर्व्ह

Story img Loader