१ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींबरोबर महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजूला ठळकपणे क्यूआर कोड छापणे, दाखवणे बंधनकारक असल्याचे महारेराने मेमध्ये जाहीर केलेले आहे. १ ऑगस्टपासून या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासकांवर ५० हजारांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. त्यानंतर १० दिवसांत चुकीची दुरुस्ती करून क्यूआर कोड ठळकपणे छापला नाही, तर “निर्देशांचा सततचा भंग” गृहीत धरून नियमानुसार यथोचित कारवाई केली जाईल.

पूर्वी रेरा क्रमांक लक्षात ठेवून महारेराच्या संकेतस्थळावर जाऊन इच्छित प्रकल्पाचा तपशील शोधावा लागायचा. आता काहीही लक्षात न ठेवताच एका क्लिकवर संबंधित प्रकल्पाची माहिती उपलब्ध होणार आहे. ग्राहकांसाठी अत्यंत दूरगामी असलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीत सहकार्य करावे, असे आवाहन महारेराने केले आहे.

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Shocking video Groom sehra catches fire during photoshoot wedding video goes viral
VIDEO:”काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात; थेट फेट्याला आग लागली अन् पुढच्याच क्षणी…
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
असा मित्र नशिबाने भेटतो! ‘तो’ अचानक छतावरून खाली कोसळला अन्…, वाचवण्यासाठी मित्राने केली धडपड, पाहा थक्क करणारा VIDEO

हेही वाचाः ऑनलाइन गेमिंगवरील कराचा अंतिम निर्णय आता GST कौन्सिलच्या आगामी बैठकीत; २८ टक्के करावर चर्चा होणार

महारेराने मार्च महिन्यात नव्याने नोंदणी करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना क्यूआर कोड द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर विशेष मेहनत घेऊन महारेराने सर्वच नव्या, जुन्या प्रकल्पांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आणि आता १ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणीही सुरू होणार आहे. विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांत जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे , इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप तत्सम समाज माध्यमे आणि विविध माध्यमांच्या मार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती करीत असतात. कुठलेही माध्यम वापरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये महारेरा क्रमांक आणि महारेरा संकेतस्थळ छापणे बंधनकारक आहेच. त्या सोबतच आता १ ऑगस्टपासून क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

हेही वाचाः बँकांनी नऊ वर्षांत १० लाख कोटींहून अधिक थकीत कर्जे केली वसूल : RBI

क्यूआर कोड छापणे बंधनकारक झाल्यामुळे घर खरेदीदारांना या प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. घर खरेदीदार किंवा स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कुणालाही संबंधित प्रकल्पाबाबत विविध प्रकारची माहिती हवी असते. यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवल्या गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का ,
असा सर्व तपशील या क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकाला निर्णय घ्यायला मदत होणार आहे.

Story img Loader