टीव्हीवरील ‘अनुपमा’ ही अनेकांच्या आवडीची मालिका आहे. या मालिकेतील रुपाली गांगुलीचे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. विशेष म्हणजे एका हटके पद्धतीने दिवाळी साजरी केल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही ‘अनुपमा’चे चाहते झाले असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही आणि त्यांनी घोषणा केली आहे की, जो कोणी ‘अनुपमा’सारखी दिवाळी साजरी करेल, त्यांची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. शेवटी ‘अनुपमा’च्या दिवाळीत काय खास आहे हे जाणून घेऊ यात…
मोदींनी शेअर केलेला हा व्हिडीओ दिवाळीच्या सणात भारतीय उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी आणि देशात बनवलेले पदार्थ जगाला अभिमानाने दाखवण्याच्या सरकारच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. व्हिडीओमध्ये ‘अनुपमा’ दिवाळीच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. बुंदीचे लाडू बनवताना ती आपल्या घरातील दिवाळीच्या तयारीबद्दल सर्वांना सांगत असते. याबरोबरच ती लोकांना भारताच्या ताकदीबद्दलही सांगत आहे, ज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओच्या शेवटी कौतुक करतात.
‘वोकल फॉर लोकल’ मधून ‘मेक इन इंडिया’ची झलक
‘अनुपमा’चा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला आहे. त्यात तुम्हाला केंद्र सरकारच्या ‘वोकल फॉर लोकल’, ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ची झलक पाहायला मिळेल. या व्हिडीओमध्ये अनुपमा घराच्या रोषणाईपासून ते दिवाळीला परिधान केलेले नवीन कपडे आणि चपलांपर्यंतच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा स्मार्टफोनही भारतातच बनवलेला असल्याचं पाहायला मिळतंय. तर ती UPI द्वारे खरेदीसाठी पैसे देत असल्याचंही दिसतंय.
पीएम मोदी तुमचा सेल्फी शेअर करणार
देशातील लोकांनी त्यांचे सण अशा पद्धतीने साजरे करावेत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी दिवाळीसाठी ‘वोकल फॉर लोकल’ उत्पादनांना प्राधान्य द्यावे. तसेच याद्वारे सामान्य लोक ‘नमो अॅप’वर अशा उत्पादनांबरोबर किंवा कारागिरांबरोबर त्यांचे सेल्फी शेअर करू शकतात. यामध्ये तो सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर करणार आहेत. येथे तुम्ही संपूर्ण व्हिडीओ पाहू शकता.