पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारी कंपन्यांच्या लाभांश, बक्षीस समभाग आणि समभाग विभाजनासंदर्भात नवीन दंडक सोमवारी लागू केले. सरकारने २०१६ नंतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी (पीएसयू) भांडवली पुनर्रचना नियमांमध्ये सुधारणा केली होती, त्यानंतर सुमारे आठ वर्षांच्या कालावधीनंतर हा बदल लागू करण्यात आला आहे.

सरकारी कंपन्यांच्या समभागांचे विभाजन आणि बक्षीस समभाग वाटपाच्या माध्यमातून सरकारी कंपन्यांच्या भागधारक आणि सरकारसाठी मूल्यनिर्मिती करण्याच्या उद्देशाने आणि त्यांना अधिकाधिक परतावा मिळावा या उद्देशाने नियमांमध्ये बदल करण्यात आले.

loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Chandrapur assembly Constituency congress candidate Praveen Padvekar
काँग्रेसने तिकीट दिले आणि वाऱ्यावर सोडले…आता दलित उमेदवार एकटाच……
Estimated tax evasion of 25 thousand crores 18 thousand fake companies busted by GST authorities print eco news
तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा
Union Ministry of Finance announced to start the fourth phase of consolidation of regional rural banks in the country
ग्रामीण बँका ४३ वरून २८ पर्यंत घटणार! अर्थ मंत्रालयाकडून विलीनीकरणाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा

हेही वाचा : सात सत्रातील ‘निफ्टी’च्या घसरणीला लगाम, ‘सेन्सेक्स’ची २३९ अंशांची मुसंडी

नवीन नियमानुसार, सरकारी कंपन्यांना निव्वळ नफ्याच्या किमान ३० टक्के किंवा एकूण मालमत्तेच्या (नेटवर्द) ४ टक्के जे जास्त असेल तितकी रक्कम लाभांश म्हणून वाटप करावी लागेल. याआधी ही रक्कम एकूण नेटवर्दच्या ५ टक्के इतकी होती. तर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेतर वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) निव्वळ नफ्याच्या किमान ३० टक्के रक्कम वार्षिक लाभांश म्हणून भागधारकांमध्ये वाटप करावी लागेल.

शिवाय समभाग पुनर्खरेदीसाठी (बायबॅक) देखील सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये वर्ष २०१६ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या २,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या तुलनेत आता ही मर्यादा वाढून ३,००० कोटी करण्यात आली आहे. म्हणजेच समभाग पुनर्खरेदी करू इच्छिणाऱ्या सरकारी कंपन्यांची मालमत्ता ३,००० कोटी असणे आवश्यक आहे. शिवाय समभाग पुनर्खरेदी करण्यासाठी रोख राखीव गंगाजळीची आवश्यक मर्यादा आधीच्या १,००० कोटींवरून वाढवून १,५०० कोटी करण्यात आली आहे. याप्रमाणचे बक्षीस समभाग (बोनस शेअर) देण्यासाठी राखीव आणि अतिरिक्त निधी हे भरणा झालेल्या भागभांडवलाच्या २० पट असणे आवश्यक आहे, जी याआधी १० पट असण्याचा नियम होता.

हेही वाचा : ‘मेटा’ला २१३ कोटी रुपयांचा दंड, भारतीय स्पर्धा आयोगाकडून कठोर शेऱ्यांसह आदेश

नवीन नियमांनुसार, सरकारी कंपन्यांना समभाग विभाजन (स्टॉक स्प्लिट) करण्यासाठी समभागांची बाजारातील किंमत त्यांच्या शेअरच्या दर्शनी मूल्याच्या १५० पट अधिक असणे आवश्यक आहे. जी वर्ष २०१६ मध्ये केवळ ५० पट असणे आवश्यक होते. शिवाय दोन समभाग विभागणींमध्ये तीन वर्षांचे अंतर असणे अनिवार्य आहे.

दोन सरकारी कंपन्यांकडून बक्षीस आणि समभाग विभाजन

माझगांव डॉकने अलीकडेच त्यांच्या समभाग विभाजनास मान्यता दिली आहे. आता १० दर्शनी मूल्य असलेले प्रत्यक्ष समभागाचे प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दोन समभागांमध्ये विभाजन करण्यात येणार आहे. एनएमडीसीसारख्या समभागाने अलीकडेच त्यांच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालांसह बक्षीस समभागाची घोषणा केली आहे. संचालक मंडळाने एका समभागासाठी दोन बक्षीस समभाग देण्यास मान्यता दिली. वर्ष २००८ नंतर एनएमडीसीने दिलेला हा पहिलाच बक्षीस समभाग आहे.