Financial Advice Finfluencers On Instagram : इन्स्टाग्रामवर रील पाहणे कोणाला आवडत नाही. अनेक जण इन्स्टाग्रामवर हल्ली रील बघण्यातच दंग असतात. विशेष म्हणजे इन्स्टाग्राम हे मनोरंजनाबरोबरच आता माहिती मिळवण्यासाठीही हे एक चांगले व्यासपीठ बनले आहे. अनेक लोक या रील्सवर वित्त आणि गुंतवणुकीशी संबंधित सल्ले देऊन दरमहा लाखो रुपये कमावतात. खरं तर इन्फ्ल्युएन्सरसारखेच तुम्हीही हे काम सुरू करू शकता का? Fininfluencers अशा लोकांना म्हणतात, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वित्त संबंधित अनेक योजना आणि गुंतवणुकीची माहिती देतात. आता तो ९० सेकंदांचा रील असो, यूट्यूबवरचा मोठा व्हिडीओ असो किंवा ६० सेकंदांचा छोटा व्हिडीओ असो, या सर्व प्लॅटफॉर्मवरून ते प्रचंड कमाई करतात.
कमाईचे कोणते मार्ग आहेत?
Finfluencer च्या रील्स किंवा व्हिडीओंद्वारे कमाई करण्याचे अनेक मार्ग आहेत. यापैकी सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे सशुल्क भागीदारी पद्धत. आज जेव्हा अनेक फिनटेक कंपन्या देशात लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत, तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या फिनफ्लुएन्सरशी संपर्क साधतात. हे फिनफ्लुएन्सर या कंपन्यांच्या उत्पादनांशी आणि जाहिरातींशी संबंधित व्हिडीओ बनवतात. त्या बदल्यात त्यांना त्यांच्या फॉलोअर्स आणि सब्सक्रायबर्सच्या आधारावर पैसे दिले जातात. दुसरीकडे Fininfluencers त्यांच्या फॉलोअर्स आणि सब्सक्रायबर्ससाठी या कंपन्यांशी संबंधित लिंक शेअर करतात, ज्यावर प्रत्येक क्लिक आणि व्यवहाराच्या आधारावर फिनफ्लुएन्सरना पैसे दिले जातात.
फिनफ्लुएन्सरचाही फायदा कंपन्यांनाच मिळतो
फिनफ्लुएन्सर यात सामील झाल्यामुळे कंपन्यांनाही फायदा होतो. कंपन्यांना त्यांचे फॉलोअर्स आणि सब्सक्रायबर्सचा एकनिष्ठ ग्राहक आधार मिळतो. त्यांच्या विश्वासार्हता आणि व्हिडीओंमुळे त्यांचे उत्पादन योग्यरीत्या विकण्यास मदत मिळते. ३० सेकंदाच्या टीव्ही जाहिरातीत हे करणे त्यांना शक्य नाही. याशिवाय हे फिनफ्लुएन्सर त्यांच्या संबंधित फॉलोअर्स आणि सब्सक्रायबर्ससाठी अनेक वित्त सल्ले देतात. यासाठी ठराविक शुल्क आकारल्याने त्यांना जादा कमाईही मिळते. इंस्टाग्रामवर काही प्रसिद्ध फिनफ्लुएन्सर आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. जसे अक्षत श्रीवास्तवचे १.४३ लाख फॉलोअर्स आहेत. अंकुर वारिकोचे २२ लाख, बूमिंग बुल्सचे २.७२ लाख, फिनोव्हेशन झेडचे १.६८ लाख, कामगार कायदा सल्लागाराचे ५.१२ लाख, प्रांजल कामरा यांचे ७.७१ लाख, रचना रानडेचे ९.३७ लाख आणि शरण हेगडे यांचे २२ लाख फॉलोअर्स आहेत. याशिवाय त्यांचे यूट्यूब, लिंक्डइन, फेसबुक आणि ट्विटरवर लाखो फॉलोअर्स आणि सब्सक्रायबर्स आहेत. हे सर्वजण या प्लॅटफॉर्मवरूनही कमाई करतात. गुगल अॅड्स आणि फेसबुक अॅड्समधून मिळणारे उत्पन्न हा यातील एक मोठा भाग आहे. Zerodha, Finshot, Smallcase, Cred, Mobikwik, Upstox, Wazir X, Kotak Life Insurance, IND Money आणि Ditto यांसारख्या कंपन्या पेड कंटेटसाठी या सर्वांना पैसे देतात.
हेही वाचाः शिक्षण अर्धवट सोडून चालवली टॅक्सी अन् आज ४० हजार कोटींचा मालक; कोण आहेत मुकेश जगतियानी?
कमिशनमधून भरपूर पैसे कमावतात
फिनटेक स्टार्टअप कंपनीच्या एका फिनफ्लुएन्सरशी मार्केटिंग करार आहे, त्याने मिंटला सांगितले की, कंपन्यांना त्यांच्या सक्रिय युजर्सपैकी ५० टक्के युजर्स या Fininfluencers कडून मिळत आहेत. त्यामुळे ते त्यांना चांगले पैसेही देत आहेत. Zerodha म्हणते की, ते Finfluencer द्वारे येणाऱ्या महसुलावर १० टक्क्यांपर्यंत कमिशन देतात. बाजार नियामक सेबीने अलीकडेच या फिनफ्लुएन्सरबाबत नियामक प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जेणेकरून जे शेअर मार्केट इत्यादीमध्ये गुंतवणूक करतात, त्यांना त्यांच्या सल्ल्याने नुकसान होणार नाही.
हेही वाचाः Artificial Intelligence च्या मदतीने ३२ वर्षांचा मुलगा झाला अब्जाधीश; कमावली ७,८२६ कोटींची संपत्ती