Adani Group : अदाणी समूहाने आज एक अधिकृत निवेदन जारी करत अमेरिकेतील फायनान्शिअल टाइम्समध्ये प्रकाशित केलेल्या अहवाल म्हणजे समूहाची प्रतिमा खराब करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अदाणी समूहाचे नाव कलंकित व्हावे, यासाठी FT च्या अहवालात प्रसिद्ध झालेले जुने आणि बिनबुडाचे आरोप पुन्हा पुन्हा केले जात असल्याचे अदाणी समूहाने स्पष्टपणे म्हटले आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी समूहाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनहिताच्या नावाखाली त्यांचे वैयक्तिक हितसंबंध पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, असाही त्यांनी पलटवार केला आहे.
फायनान्शियल टाइम्सने नेमके काय आरोप केलेत?
अदाणी ग्रुपने सांगितले की, फायनान्शिअल टाइम्सच्या आरोपांच्या मोहिमेच्या हल्ल्याचे नेतृत्व डॅन मॅकक्रम करीत आहे, ज्यांनी OCCRP बरोबर मिळून अदाणी समूहाबद्दल खोटी माहिती पसरवली. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अदाणी समूहाविरुद्ध एक कथित कथा तयार केली. OCCRP ला जॉर्ज सोरोस हे निधी पुरवत आहेत, ज्यांनी अदाणी समूहाविरुद्ध उघडपणे आपले वैर जाहीर केले आहे.
हेही वाचाः एलॉन मस्कच्या संपत्तीबरोबरच मुकेश अंबानींची संपत्ती वाढली, जाणून घ्या जगातील टॉप १० अब्जाधीश कोण?
फायनान्शिअल टाइम्सचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर एफटी अदाणी समूहाला आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा आणखी एक प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत कोळशाच्या ओव्हर इनव्हॉइसिंगचे जुने बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच एफटीची प्रस्तावित कथा डीआरआयच्या सामान्य अलर्ट परिपत्रकावर आधारित आहे, ज्याबद्दल यापूर्वी देखील स्पष्टीकरण दिले गेले आहे.
OCCRP ने अहवाल प्रसिद्ध केला होता
मीडिया संस्था ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये अदाणी समूहावर अनेक आरोप करण्यात आले होते. अहवालानुसार, ‘अपारदर्शक’ मॉरिशस फंडाच्या माध्यमातून अदाणी समूहाच्या काही सार्वजनिक व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली होती. OCCRP ने म्हटले आहे की, एकाधिक टॅक्स हेव्हन्स आणि अंतर्गत अदाणी ग्रुप ईमेल्सच्या फायलींच्या पुनरावलोकनाच्या आधारे तपासात किमान दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यात अदाणी समूहाच्या गुंतवणूकदारांनी ऑफशोर स्ट्रक्चर्सद्वारे अदाणी स्टॉकची खरेदी आणि विक्री केली आहे.
त्यावेळीही अदाणींनी नकार दिला होता
कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे अदाणी समूहाने आरोपांच्या वेळी स्पष्टपणे सांगितले होते. आम्हाला आमच्या खुलाशांच्या गुणवत्तेबद्दल आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मानकांबद्दल खात्री आहे. या बातम्यांच्या अहवालांची वेळ संशयास्पद आणि दुर्भावनापूर्ण आहे आणि आम्ही हे अहवाल पूर्णपणे नाकारतो, असंही अदाणी समूहाने स्पष्ट केले आहे.