पुणे : काही दिवसांपासून चर्चेत असलेली बजाज ऑटोकडून सादर होणारी सीएनजी दुचाकी येत्या १८ जूनला सादर केली जाईल, अशी घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी शुक्रवारी केली. बजाज ऑटोने ‘पल्सर एनएस ४०० झेड’ ही दुचाकी शुक्रवारी सादर केली. यावेळी बोलताना बजाज म्हणाले की, इंधनाच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्राहकांना परवडेल अशा इंधनावरील दुचाकीचा विचार सुरू होता. त्यातून सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीची कल्पना समोर आली. कारण सीएनजीवर चालणाऱ्या मोटारी आणि तीनचाकी वाहनांमुळे इंधन खर्चात मोठी कपात होते. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून सीएनजी दुचाकीची निर्मिती करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अदानी समूहातील सहा कंपन्यांना ‘सेबी’ची कारणे दाखवा नोटीस

बजाजची सीएनजी दुचाकी १८ जूनला सादर केली जाणार आहे. या दुचाकीमुळे इंधन खर्चात सुमारे ५० टक्के बचत होईल. ‘पल्सर एनएस ४०० झेड’ ही स्पोर्ट्स बाईक श्रेणीतील आणि एनएस मालिकेतील दुचाकी आहे. आधी कंपनीने एनएस १२५, एनएस १६०, एनएस २०० या दुचाकी सादर केल्या होत्या. ‘एनएस ४०० झेड’ची इंजिन क्षमता ३७३.२७ सीसी आहे. याचबरोबर तिच्यामध्ये वेगवेगळे राईड मोड आणि स्लीपर क्लच आहे. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण आणखी वाढून चालकाला चालविण्याचा चांगला अनुभव मिळतो. ही दुचाकी चार रंगात उपलब्ध करून देण्यात आली असून, तिची किंमत दिल्लीत १ लाख ८५ हजार रुपये (एक्स शोरूम) आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First bajaj cng motorcycle to be launched on june 18 print eco news zws