पीटीआय, नवी दिल्ली
केंद्र सरकारची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरअखेरीस ७.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी निर्धारित उद्दिष्टाच्या ३९.३ टक्क्यांवर ही तूट पोहोचली असून, मागील वर्षी याच कालावधीत ती उद्दिष्टाच्या ३७.३ टक्के होती.
हेही वाचा… निफ्टी-सेन्सेक्ससाठी २०२३ मधील सर्वात वाईट महिना
सरकारचा खर्च आणि जमा होणारा महसूल यातील फरक म्हणजे वित्तीय तूट असते. महालेखापालांनी (कॅग) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरअखेर वित्तीय तूट ७.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५.९ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ठेवले आहे. मागील आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत ६.४ टक्के होती.
केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरअखेर ११ लाख ६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वार्षिक उद्दिष्टाच्या ४९.८ टक्के हा महसूल आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत निव्वळ कर संकलन वार्षिक उद्दिष्टाच्या ५२.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. केंद्र सरकारचा सप्टेंबरअखेर खर्च २१.१९ लाख कोटी रुपये आहे. वार्षिक उद्दिष्टाच्या तो ४७.१ टक्के आहे.