पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मजबूत देशांतर्गत मागणी, ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास आणि व्यवसायाची शाश्वत पातळी याच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहिला असा विश्वास जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने व्यक्त केला आहे. परिणामी पुढील आर्थिक वर्षासाठी देशाचा विकासदराचा अंदाज सुधारत तो ७ टक्क्यांवर नेला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ८.४ टक्के राहिले. तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांनी विस्तारत असल्याचे समोर आले. जो सरकारच्या ७.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक राहिला आहे. आगामी आर्थिक वर्षात देशांतर्गत मागणी, विशेषत: गुंतवणूक, व्यवसाय आणि ग्राहकांचा आत्मविश्वास हे वृद्धीचे मुख्य चालक असतील.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 14 March 2024: सोने-चांदीच्या दराने घेतली जोरदार उडी, खरेदीवर होणार खिसा रिकामा, वाचा आजचे दर

जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच’ने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, मजबूत देशांतर्गत मागणीमुळे सरलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची कामगिरी चमकदार राहिली आहे. यादरम्यान वार्षिक आधारावर गुंतवणूक वृद्धीदर १०.६ टक्के आणि खासगी उपभोग ३.५ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. ‘फिच’ने २०२४ चा जागतिक विकास दराचा अंदाज ०.३ टक्क्यांनी वाढवून २.४ टक्क्यांवर नेला आहे. कारण नजीकच्या काळात जागतिक विकासाच्या शक्यता सुधारल्या आहेत.

हेही वाचा >>>सरकारी बँकांना सुवर्ण तारण कर्जाचे पुनरावलोकन करण्याच्या सूचना

डिसेंबर२०२३ मध्ये वर्तविण्यात आलेला अमेरिकेचा विकासदर १.२ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तर आगामी वर्षात चीनच्या विकासदराच्या अंदाजात किरकोळ कपात केली आहे. तो आता ४.६ टक्क्यांवरून ४.५ टक्क्यांपर्यंत आणला आहे आणि युरोझोनच्या अंदाजात किरकोळ सुधारणा करत, तो ०.६ टक्क्यांवरून ०.७ टक्क्यांपर्यंत सुधारला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitch revised its forecast to 7 percent for the next financial year print eco news amy