मुंबईः आघाडीची एमएसएमई-केंद्रित बँकेतर वित्तीय संस्था ‘फ्लेक्सीलोन्स’ने महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. भारतात सध्या ८० लाखांहून अधिक महिलांच्या मालकीच्या एमएसएमई कार्यरत आहेत आणि या व्यवसायांद्वारे देशाच्या सकल उत्पादनांत (जीडीपी) २८० अब्ज डॉलरपेक्षा अधिक योगदानाची क्षमता असल्याचे ‘मॅकिन्झी’च्या अहवालाचे भाकित आहे.

तथापि, केवळ १० टक्के महिला उद्योजकांना औपचारिक पतपुरवठा उपलब्ध असल्याने त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. तारण-मुक्त व्यावसायित कर्ज सुलभ करून महिलांच्या नेतृत्वाखालील या व्यवसायांच्या वाढीला चालना देण्याचे फ्लेक्सीलोन्सचे उद्दिष्ट आहे, असे तिचे सह-संस्थापक रितेश जैन यांनी नमूद केले. कंपनीने मागील पाच वर्षांत महिला कर्जदारांमध्ये २.३ पट अशी लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

२०१९ मधील १,३०० वरून ही संख्या २०२४ मध्ये ३,००० हून अधिक झाली आहे. त्यांचे सरासरी कर्ज या काळात ४.०४ लाखांवरून ८१ टक्के वाढीस ७.३१ लाखांवर पोहोचले आहे. ही वाढ देशातील महिलांमध्ये, विशेषतः टियर २ आणि ३ शहरांमधील वाढत्या महिला उद्यमशीलतेला अधोरेखित करते, ज्यांचा एकत्रितपणे फ्लेक्सीलोन्सच्या महिला कर्जदारांमध्ये सुमारे ७० टक्के वाटा आहे.

Story img Loader