ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने १३ जून २०२३ रोजी खुल्या बाजारातील विक्री योजनेद्वारे गहू आणि तांदूळ यांच्या साठ्याचे वितरण करण्यास एका पत्राद्वारे मंजुरी दिली होती. त्यानुसार केंद्रीय साठ्यामधून ५० लाख मेट्रिक टन गव्हाचे वितरण पिठाच्या गिरण्या/ प्रक्रियाकर्ते/ गव्हाच्या उत्पादनांचे निर्माते यांना प्रति पॅनकार्ड १०० मेट्रिक टन मर्यादेसह खुल्या बाजारातील विक्री योजना(देशांतर्गत) अंतर्गत ई-लिलावाद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गव्हाच्या वाढत्या भावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष ग्राहकांना स्थिर झालेल्या भावांचा लाभ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचाः Money Mantra : Linked FD आणि सामान्य मुदत ठेवीत फरक काय? अधिक परतावा कुठे मिळणार? जाणून घ्या
त्याच प्रकारे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खुल्या बाजारातील विक्री योजना(देशांतर्गत)द्वारे २५ लाख मेट्रिक टन तांदळाच्या विक्रीला देखील मंजुरी दिली आहे. उत्पादक आणि प्रक्रियाकर्त्यांव्यतिरिक्त तांदळाच्या व्यापाऱ्यांना देखील तांदळाच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार बोलीदार १० मेट्रिक टन ते कमाल २०० मेट्रिक टनांपर्यंत गव्हाची आणि तांदळाची १० मेट्रिक टनांपासून कमाल १००० मेट्रिक टनांपर्यंत बोली लावू शकतो. एफसीआयचा गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठीचा लिलाव २८ जून २०२३ रोजी सुरू झाला आणि नंतर प्रत्येक बुधवारी लिलाव करण्यात आला.
हेही वाचा: एकेकाळी ४७ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन होते, आता जगातील सर्वात मोठी कंपनी दिवाळखोरीत
आतापर्यंत गव्हाचे १९ आणि तांदळाचे १६ लिलाव झाले आहेत. या लिलावादरम्यान ७,४०,७१० MT गहू आणि ११,११,९२० MT तांदूळ वितरित करण्यात आला आहे. या लिलावात सामान्य सरासरी प्रतीच्या गव्हासाठी २१५०/क्विंटल, निकषांमधील सवलतप्राप्त गव्हासाठी २१२५/क्विंटल, पोषणमूल्य जास्त असलेल्या तांदळासाठी २९७३/क्विंटल आणि सामान्य सरासरी प्रतीच्या तांदळासाठी २९००/क्विंटल राखीव दराने या लिलावात विक्री करण्यात आली. यापैकी गव्हाची स्वीकृत प्रमाण ४,१८,८९० MT आणि तांदळाचे १६९० MT इतकी उचल करण्यात आली. एफसीआयने इतक्या मोठ्या प्रमाणात खुल्या केलेल्या या धान्यामुळे गहू आणि तांदळाच्या दरांच्या वाढत्या कलावर नियंत्रण ठेवता आले.