वृत्तसंस्था, नवी दिल्ली

वर्ष २०२३ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ४३ टक्क्यांनी घसरली असून, ती २८ अब्ज डॉलरवर सीमित राहिली आहे, असे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या अहवालात म्हटले आहे.एफडीआय प्रवाहाच्या बाबतीत देशाची पीछेहाट झाली असून वर्ष २०२२ मधील आठव्या स्थानावरून तो वर्ष २०२३ मध्ये १५ व्या स्थानावर घसरला आहे. वर्ष २०२२ मध्ये, देशातील एफडीआयचा प्रवाह १० टक्क्यांनी वाढून ४९ अब्ज डॉलरवर गेला होता.

A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
stock market ups downs loksatta
Money Mantra : कधी अप कधी डाऊन ! गुंतवणूकदारांनी करायचं तरी काय ?
households savings shift from bank fds to mutual funds and insurance in last 3 years
घरगुती बचतीचे वळण म्युच्युअल फंडांकडे, तरी ‘एफडीं’चा वरचष्मा कायम : स्टेट बँकेचा अहवाल
Investors lost Rs 18 lakh crore in a week
सप्ताहाभरात गुंतवणूकदारांना १८ लाख कोटी रुपयांचा फटका ; ‘सेन्सेक्स’ची ११ शतकी घसरण
Indian stock market returns higher than US stock market
अमेरिकी शेअर बाजारापेक्षा भारतीय शेअर बाजारातून जास्त ‘रिटर्न’ 
What is the reason for the fall in the stock market and rupee
विश्लेषण: शेअर बाजार, रुपया पडण्याचे कारण काय?
sensex marathi news
परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने ‘सेन्सेक्स’ला पाच शतकी झळ

विद्यमान २०२४ मध्ये देखील उर्वरित कालावधीत एफडीआयसाठी परिस्थिती आव्हानात्मक राहणार असून, संपूर्ण वर्षासाठी त्यात माफक वाढ शक्य आहे, असे अहवालात म्हटले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये ग्रीनफिल्ड म्हणजेच संपूर्णपणे नवीन प्रकल्प कार्यान्वयनासाठी भारत एक स्थानाने घसरून चौथा सर्वात मोठा देश ठरला. आंतरराष्ट्रीय प्रकल्प सौद्यांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर इतर देशात गुंतवणूक करण्याच्या बाबतीत, भारताचा क्रमांक २०२२ मधील २३ व्या क्रमांकावरून २०२३ मध्ये २० व्या क्रमांकापर्यंत उंचावला आहे.

हेही वाचा >>>‘सेन्सेक्स’ची ७८ हजाराच्या दिशेने चाल

अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, आघाडीच्या जी-२० अर्थव्यवस्थांमध्ये, एफडीआय प्रवाहातील सर्वात मोठी घसरण फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका आणि भारतामध्ये नोंदवली गेली आहे. विकसनशील आशियातील एफडीआय ८ टक्क्यांनी घसरून ६२१ अब्ज डॉलरवर आला. तथापि घसरण होऊनही चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एफडीआय ओघ मिळविणारा देश ठरला आहे.

२०२३मधील क्रमवारी एफडीआय प्रवाह २०२२ एफडीआय प्रवाह २०२३

                         (आकडे अब्ज डॉलरमध्ये)

१ अमेरिका (१) ३३२ ३११

२ चीन (२)             १८९ १६३

३ सिंगापूर (३)             १४१ १६०

४ हाँगकाँग (४) ११० ११३

५ ब्राझील (६)             ७३ ६६

६ कॅनडा (९)             ४६ ५०

७ फ्रान्स (५)             ७६ ४२

८ जर्मनी (१७)             २७ ३७

९ मेक्सिको (१२)             ३६ ३६

१० स्पेन (१०)             ४५ ३६

१५ भारत (८)             ४९ २८

Story img Loader