मुंबई : भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली असून, १४ जुलै रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी १२.७४ अब्ज डॉलरने वाढून ६०९.०२ अब्ज डॉलरवर पोहोचली असून ही तिची मागील १५ महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेली आकडेवारी स्पष्ट करते. आधीच्या आठवड्यात परकीय चलन गंगाजळी ५९६.२८ अब्ज डॉलर पातळीवर होती.

ऑक्टोबर २०२१ मध्ये, देशाच्या परकीय चलन गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठली होती. तर भांडवली बाजारात झालेली घसरण, रशिया-युक्रेन युद्ध, खनिज तेलाच्या दराने गाठलेला उच्चांक आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन यामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये ती ५२४.५२ अशी दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर गडगडली होती. मात्र सध्या भांडवली बाजारातील विक्रमी तेजी आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू राहिलेला डॉलर-पौंडाचा लक्षणीय ओघ या जोरावर गंगाजळीने पुन्हा एकदा ६०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने दिलेल्या आकडेवारीनुसार, परकीय गुंतवणूकदारांनी गेल्या तीन महिन्यांत भारतीय भांडवली बाजारात १,६०० कोटी डॉलर मूल्याची नक्त समभाग खरेदी केली आहे.

GAURAV MUTHE

Story img Loader