मुंबई : देशाच्या परकीय गंगाजळीत उतार कायम असून ६ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात, ती ३.२३ अब्ज डॉलरने घसरून ६५४.८५ अब्ज डॉलरपर्यंत म्हणजेच पाच महिन्यांपूर्वीच्या नीचांकपदी गेली आहे. प्रति डॉलर ८५ च्या पातळीपर्यंत गडगडता रुपया या घटीमागे आहे.

भांडवली बाजारातून परकीयांच्या गुंतवणुकीची निरंतर सुरू असलेली माघार आणि अमेरिकेतील घडामोडींनी डॉलरने कमावलेली सशक्तता यातून रुपयाच्या विनिमय मूल्यात आणखी घसरण झाली असून त्याने सध्या प्रति डॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. परिणामी घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सक्रियपणे हस्तक्षेप म्हणून गंगाजळीतील डॉलरची विक्री केली जात असल्याचा विश्लेषाकांचा दावा आहे.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
Rupee continues to decline against dollar print eco news
रुपया ८५.८७ च्या गाळात!

हेही वाचा >>>स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस

याआधी २७ सप्टेंबर २०२४ ला संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळी ७०४.८८ अब्ज डॉलर या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र आयातदारांकडून होत असलेल्या मागणीमुळे उच्चांकी पातळीपासून आजपावेतो त्यात सुमारे ५० अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. सरलेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठादेखील कमी होऊन ६६.९३ अब्ज डॉलरवर घसरला आहे.

Story img Loader