पीटीआय, हैदराबाद

भारताने विकसित देश बनण्यासाठी आधी कुपोषणासारख्या समस्या सोडवायला हव्यात. याचबरोबर मनुष्यबळ ही सर्वांत मोलाची संपत्ती असून, त्याकडे देशाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी येथे मांडले.

येथे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस संकुलात आयोजित कार्यक्रमात राजन बोलत होते. कुपोषणाची समस्या असलेला देश विकसित कसा बनू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, आपण तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसह, २०४७ पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत जाण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. उदाहरणादाखल बोलायचे झाल्यास २०४७ मध्ये विकसित आणि श्रीमंत असलेल्या देशात ३५ टक्के कुपोषित असतील तर तुमचे हे उद्दिष्ट विनोदाचा विषय ठरेल. कारण आता लहान असलेली मुले १० वर्षांनी त्यासमयी उत्पादक मनुष्यबळात दाखल झालेले असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>सात रुपयांची कागदी पिशवी अन् फॅशन ब्रँडला भरावा लागला ३०० पट अधिकचा दंड; नेमकं झालं काय? वाचा

देशातील मनुष्यबळाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तरुणांना व्यापक स्तरावर प्रशिक्षण द्यायला हवे. मध्यम कालावधीसाठी अर्थव्यवस्थेची योग्य वाटचाल करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मनुष्यबळावर लक्ष केंद्रित करावेच लागेल. आपल्याकडे १४० कोटी इतकी लोकसंख्या असून, ती जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त आहे. आपण जर मोठ्या संख्येने लोकांना प्रशिक्षित करू शकलो तर मूल्यवर्धनाच्या बाबतीत आपण मोठा टप्पा गाठू. आतापासूनच सुरुवात करून कुठे चुका होताहेत हे तपासून त्या दुरुस्त करायला हव्यात, असेही राजन यांनी स्पष्ट केले.

बँकिंग व्यवस्थेची स्वच्छता पूर्ण

बँकिंग व्यवस्था स्वच्छ करण्याची मोहीम राजन यांनी गव्हर्नरपदी असताना हाती घेतली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, बँकिंग व्यवस्था स्वच्छ होण्यासाठी खूप काळ लागला. आता बँकिंग व्यवस्था स्वच्छ झाली आहे, असे मला निश्चितच वाटते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former reserve bank governor raghuram rajan opinion on developed countries print eco news amy