आयफोन निर्माता कंपनी अॅपलची पुरवठादार फॉक्सकॉनने तेलंगणामध्ये ५०० दशलक्ष डॉलर (सुमारे ४११६ कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. एवढेच नाही तर फॉक्सकॉनच्या या प्रकल्पाच्या मदतीने राज्यात नवीन रोजगारही उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २५००० हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी फॉक्सकॉनच्या या प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे.
केटी रामाराव यांनी ट्विट करून दिली माहिती
तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास मंत्री केटी रामाराव यांनी ट्विट करत याची घोषणा केली. फॉक्सकॉनचा प्लांट हैदराबादजवळील रंगा रेड्डी जिल्ह्यात (कोंगार कलान, रंगा रेड्डी जिल्हा) बनवला जाणार आहे. तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन आणि नगरविकास मंत्री केटी रामाराव यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
तेलंगणातील फॉक्सकॉनच्या पहिल्या प्लांटबद्दल माहिती देताना मला खूप आनंद होत आहे. फॉक्सकॉनच्या या करारामुळे राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे २५,००० पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. केटीआर हे तेलंगणाचे आयटी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्री आहेत. ते नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास मंत्रालयाव्यतिरिक्त उद्योग आणि वाणिज्य विभागाचे काम देखील हाताळतात.
हेही वाचाः विश्लेषण: अमेरिकेच्या एका चुकीमुळे सोन्याचा भाव ६५ हजारांवर पोहोचण्याची शक्यता; वाचा स्पेशल रिपोर्ट
जागतिक दर्जाची उत्पादन सुविधा देण्याची योजना
वापरकर्त्यांना जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फॉक्सकॉनचा तेलंगणात उभारण्यात येणारा प्लांट कंपनीसाठी अनेक प्रकारे खास मानला जात आहे. कंपनीच्या जागतिक विस्तार धोरणासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. फॉक्सकॉन ही आयफोनची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे. या कंपनीचे मुख्यालय तैवानमधील न्यू तैपेई शहरात आहे. कंपनीचे बहुतांश प्लांट शेजारील चीनमध्ये आहेत. या नवीन प्रकल्पासाठी कंपनीने तेलंगणा सरकारचे आभार मानले आहेत. व्यवसायासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल कंपनीने तेलंगणातील राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
हेही वाचाः अदाणी कंपन्यांची २०१६ पासून चौकशी सुरू होती हा तथ्यहीन आरोप; सेबीचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण