मुंबई: सरलेल्या ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत संस्थात्मक (डीआयआय) गुंतवणूकदारांनी सुमारे १ लाख कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. तर याच काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ८५,००० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. अलीकडील म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून सुरू असलेली समभाग खरेदी ही भांडवली बाजारातील संरचनात्मक बदल दर्शवितो. हा कल घसरत्या बाजाराला सावरून कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन योग्य पातळीवर राखण्याचे कार्य करेल. तर परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीमुळे बाजारात चढ-उतार असूनही बाजाराला आवश्यक स्थिरता प्रदान करेल, असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

‘डीआयआय’कडून सुरू असलेला निधी प्रवाह हा मुख्यतः विमा आणि सेवानिवृत्ती निधीसह गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असणाऱ्या, म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ योगदानाचा परिणाम आहे. विद्यमान महिन्यात निव्वळ ‘एसआयपी’ प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सेवानिवृत्ती निधी प्रवाह मजबूत राहण्याची आणि वाढत राहण्याची शक्यता आहे. याआधी, मार्च २०२४ मध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सर्वाधिक ५६,३५६ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली होती. शिवाय गुंतवणुकीसाठी उल्लेखनीय ठरलेल्या इतर महिन्यांमध्ये मे २०२४ चा समावेश आहे, त्या महिन्यात ५५,७०० कोटींहून अधिक; मार्च २०२० मध्ये सुमारे ५४,८५७ कोटी आणि मे २०२२ मध्ये ४९,४०० कोटींहून अधिक गुंतवणूक केली होती.

stock market crash
शेअर बाजारात तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
rbi bans four micro finance from issuing loans
अग्रलेख : ‘मायक्रो’चे मृगजळ!
Chandrababu Naidu and MK Stalin Push For More Kids
अग्रलेख : जनांचा प्रवाहो आटला…
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
steering committee approves maharashtras revised curriculum
अग्रलेख : आम्ही अडगेची राहू….

हेही वाचा >>> सरकारी बँका, वित्त संस्थांची भंगार विक्रीतून ४.५ कोटींची कमाई

सध्या सुरू असलेला सणासुदीचा हंगाम, अपेक्षेपेक्षा चांगला मान्सून आणि ग्रामीण उपभोगातील वाढ हे घटक नजीकच्या काळात बाजारासाठी उत्प्रेरक ठरू शकतील. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हसह प्रमुख जागतिक मध्यवर्ती बँकांनी व्याज कपातीच्या चक्राकडे मार्गक्रमण सुरू केले आहे. दरम्यान, भू-राजकीय तणाव आणि समभागांच्या चढ्या मूल्यांकनामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्री सुरू ठेवली आहे.

हेही वाचा >>> Muhurat Trading Day: सवंत्सर २०८१ बक्कळ लाभाचे… मुहूर्ताला सेन्सेक्सची ३३५ अंशांची कमाई

आतापर्यंत विक्री कशी?

‘एफआयआय’कडून ऑक्टोबर हा विक्रमी समभाग विक्रीचा महिना ठरला. ‘एनएसडीएल’च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये त्यांनी ८५,३९० कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या समभागांची विक्री केली आहे. त्याआधी मार्च २०२० मध्ये ६२,४३३ कोटी, जून २०२२ आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये अनुक्रमे ४९,४६८ कोटी आणि ३७,६८९ कोटी रुपयांची विक्री केली होती. चीनने अर्थ-प्रोत्साहनासाठी योजलेल्या उपायांमुळे परदेशी गुंतवणूकदार समभागांच्या तुलनेने स्वस्त मूल्यांकन असलेल्या चिनी बाजारपेठेकडे वळत आहेत.