वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात डिजिटल अर्थव्यवस्था, उत्पादन क्षेत्र आणि हरित इंधन या क्षेत्रांत दोन्ही देशांदरम्यान सहकार्याची पावले उचलली जाणार आहेत. या दौऱ्यात भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणाली फ्रान्समध्ये सुरू केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम
Appointments of private secretaries to ministers only after approval of the Chief Minister Mumbai news
मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्त्या; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससाठीही निर्देश बंधनकारक
Loksatta anvyarth Right to Information Government Implementation Maharashtra State Act
अन्वयार्थ: माहिती अधिकाराची ऐशीतैशी
Registration for CET exam admissions begin next week
सीईटीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार
Suvendu Adhikari Contai Cooperative Bank polls
Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेसकडून घरच्या मैदानावर धुव्वा, सुवेंदु अधिकारी यांच्या अडचणी वाढणार?
Hospital Thane, Thane Arogya Vardhini Center,
ठाण्यात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी जागा मिळेना

सध्या भारताबाहेर, सिंगापूरमध्ये यूपीआय प्रणालीचा वापर सुरू आहे. याच वर्षी यूपीआय प्रणाली चालविणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि सिंगापूरमधील पेनाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केली. यामुळे यूपीआयचा वापर सिंगापूरमध्ये आणि पेनाऊचा वापर भारतामध्ये करणे शक्य झाले. एनपीसीआय आणि फ्रान्समधील लायरा या कंपन्या वर्षभरापासून यावर काम करीत आहेत. मोदींच्या दौऱ्यादरम्यान याबाबत निर्णय यूपीआयचा वापर सुरू करणारा फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश ठरेल.

हेही वाचा… पतंजली फूड्सकडून प्रत्येकी १,००० रुपयांनी समभाग विक्री

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ‘यूपीआय’ प्रणाली विकसित केली आहे. तिच्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे आणि सध्या देशातील सुमारे ४०० बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्या ‘यूपीआय’शी जोडल्या गेल्या आहेत.

हेही वाचा… केंद्र सरकार होणार मालामाल, ऑनलाइन गेमिंगवर जीएसटीमुळे तिजोरीत तब्बल २०,००० कोटींची भर पडणार

भारत-फ्रान्समधील उद्योगपतींची बैठक

‘भारत-फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदे’चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या परिषदेची बैठक पॅरिसमध्ये १४ जुलैला होणार असून, त्यात दोन्ही बाजूंकडील १० ते १२ उद्योगपती उपस्थित असतील. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्युबिलंट समूहाचे सहअध्यक्ष हरी भाटिया आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कॅपजेमिनी एसईचे अध्यक्ष पॉल हर्मिलीन करणार आहेत.

Story img Loader