मुंबई : जवळपास तीन दशकापासून देशात कार्यरत जगन्मान्य फंड घराणे फ्रँकलिन टेम्पलटनने, तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर दोन नवीन रोखेसंलग्न (डेट) योजना दाखल करीत असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.
आता पुनरागमन करताना, फ्रँकलिन टेम्पलटन एएमसीद्वारे अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड आणि मीडियम टू लाँग ड्युरेशन फंड या निश्चित उत्पन्न प्रकारातील दोन नवीन योजना दाखल झाल्या आहेत. अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड हा १९ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या (एनएफओ) कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. फंड घराण्याच्या निश्चित उत्पन्न विभागातील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी राहुल गोस्वामी आणि पल्लब रॉय यांच्याद्वारे हा नवीन फंड व्यवस्थापित केला जाईल. व्याजदरातील फेरबदलाची उच्च जोखीम असणारी ही योजना तीन वर्षे व अधिक काळासाठी गुंतवणुकीचे उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य ठरेल. किमान ५,००० रुपये आणि त्यानंतर १,००० रुपयांच्या पटीत या योजनेत गुंतवणूक करता येईल, तर किमान ५०० रुपयांपासून नियमित ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू ठेवता येईल.
हेही वाचा…काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ दरात कपात? मंत्रिगटाकडून कर अधिकाऱ्यांच्या समितीला मूल्यमापनाचे निर्देश
नव्याने दाखल दुसरी योजना म्हणजे मीडियम टू लाँग ड्युरेशन फंड येत्या २ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या (एनएफओ) कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली असेल. ही योजना चांदनी गुप्ता आणि अनुज टागरा यांच्याद्वारे व्यवस्थापित केली जाईल.
हेही वाचा…सोने तारण कर्ज बाजारपेठेत दुपटीने वाढ! ‘पीडब्ल्यूसी इंडिया’चा भविष्यवेध
एप्रिल २०२० मध्ये या फंड घराण्याने तरलतेच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, जवळपास २५ हजार कोटींची मालमत्ता असलेल्या सहा रोखेसंलग्न योजना गुंडाळत असल्याची घोषणा केली होती. गुंतवणूकदारांतील विश्वासार्हता धोक्यात आणणाऱ्या या घटनेनंतर, आता सर्व गुंतवणूकदारांना त्यांचा निधी पूर्णपणे परत केला गेल्याचे फंड घराण्याने स्पष्ट केले आहे. ३० जूनअखेर फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया म्युच्युअल फंडाकडून व्यवस्थापित एकूण गुंतवणूक मालमत्ता १.०२ लाख कोटी रुपये आहे.