नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रमुख आठ क्षेत्रात सरलेल्या डिसेंबर महिन्यात घसरण होऊन, ती ३.८ टक्क्यांच्या १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत आक्रसली. नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रमुख क्षेत्रांच्या वाढीची ७.९ टक्के पातळी नोंदवली गेली होती. तर गेल्या वर्षी याच महिन्यात (डिसेंबर २०२२) त्यांनी ८.३ टक्के वाढ साधली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मोबाइलच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात; केंद्र सरकारचा निर्णय; ॲपल, शाओमीला फायदा होणार

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट आणि ऊर्जा या क्षेत्रांचा प्रमुख आठ उत्पादन क्षेत्रांत समावेश होतो. विद्यमान आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते डिसेंबर २०२३ या पहिल्या नऊ महिन्यांत प्रमुख क्षेत्राची वाढ ८.१ टक्के नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती ८.१ टक्के पातळीवरच होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frastructure sector growth hits 14 month low in december print eco news zws