पीटीआय, नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन संसदेने मंगळवारी मंजुरी दिल्याने, आता परस्पर सहमतीने ठरणाऱ्या तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल. भारताच्या सध्या इंग्लड आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत मुक्त व्यापार करारासंबंधी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी, त्याला ऑस्ट्रेलियाच्या संसदेकडून मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी दिली गेल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ट्वीट करून मंगळवारी घोषित केले. भारतात, अशा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनीही ट्वीटच्या माध्यमातून, भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला तेथील संसदेने दिलेल्या मंजुरीबद्दल आनंद व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा