मुदती संपण्यापूर्वी महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण केले नाही तर दंड आणि शुल्क आकारले जाऊ शकते, ज्यामुळे तुमची बचत कमी होऊ शकते. जसजसे नवीन वर्ष जवळ येत आहे, तसतसे तुमच्या पैशांच्या बाबींवर परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या आर्थिक मुदतीबद्दल जागरुक राहणे आवश्यक आहे. या मुदतीबद्दल माहिती असेल तर तुम्ही माहितीपूर्ण निर्णय वेळीच घेऊ शकता आणि तुमच्या आर्थिक नुकसान होणे टाळू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आर्थिक मुदती टुकवल्यास दंड आणि शुल्क आकारले जाऊ शकते, ज्यामुळे तुमची बचत कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचा आधार तपशील अंतिम मुदतीपर्यंत अपडेट करण्यात अयशस्वी झालात, तर तुम्हाला असे करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.

डिसेंबर २०२३ साठी भारतातील काही महत्त्वाच्या आर्थिक मुदती येथे आहेत:

आधार अपडेटसाठी अंतिम मुदत: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या नवीन लोकसंख्याशास्त्रीय तपशीलासह (demographic details) जसे की पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी इ. माहिती भरून अपडेट करू शकता तेही अगदी विनामूल्य पण ३१ डिसेंबर २०२३ नंतर तुम्हाला आधार अपडेटसाठी फी भरावी लागेल.

बँक लॉकर करारांमध्ये सुधारणा करण्याची अंतिम मुदत:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना त्यांच्या ग्राहकांसोबत सुधारित लॉकर ( revised locker) करार अंमलात आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने मुदत दिली आहे. पहिल्या टप्प्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर 2023 आहे. नवीन लॉकर करारांमध्ये काही महत्त्वाचे बदल असतील, जसे की लॉकरमधील सामनाचे नुकसान झाल्यास भरपाईची उच्च मर्यादा बँकांना द्यावी लागेल.

डीमॅट खात्यांसाठी Nomination अर्ज करण्याची अंतिम मुदत:

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने (सेबी) डीमॅट खात्यांसाठी Nomination अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. एक Nomination अर्ज तुम्हाला तुमच्या डीमॅट सिक्युरिटीज तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला कोणाला वारसा मिळावा हे निश्चित करण्याची परवानगी देतो.

विशेष मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत:

काही बँका डिसेंबर २०२३ पर्यंत उच्च व्याजदरासह विशेष मुदत ठेवी (fixed deposits) देऊ करत आहेत. पण, या ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत आहे. उदाहरणार्थ, इंडियन बँकेच्या “इंड सुपर ४००(Ind Super 400)” आणि “इंड सुप्रीम ३०० दिवसांच्या (Ind Supreme 300 days)” मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. त्याचप्रमाणे, SBI अमृत कलश FD देखील डिसेंबरच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठेवी स्विकारत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश मुदत ठेव योजना यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत वैध होती. SBI ने १५ फेब्रुवारी २०२३ रोजी ही विशेष FD योजना सुरू केली. अमृत कलश ठेव योजना भारतीय नागरिक आणि NRI ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या मुदत ठेवीवरील व्याज मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक अंतराने मिळू शकते. TDS मधून कापलेले व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा होते.