नवी दिल्ली, पीटीआय : देशातील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमतीत सरासरी ०.६ टक्के वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. येत्या १ मेपासून प्रवासी वाहनांच्या प्रकार आणि श्रेणीनुसार किंमतवाढ होणार आहे. वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ आणि बीएस ६ च्या नियामक बदलांमुळे एकूण खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता किमती वाढविणे भाग ठरले. मात्र ग्राहकांवर कमीत कमी भार पडावा असे प्रयत्न केले गेले आहेत, असेही कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनी देशांतर्गत बाजारात टियागो, टिगोर, अल्ट्रोझ, नेक्सॉन, हॅरियर, सफारी आणि पंच यांसारख्या विविध वाहनांची विक्री करते, ज्यांच्या किमती ५.५४ लाख आणि २५ लाख रुपये आहेत.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Navi Mumbai corporation new policy car Parking problem
नवी मुंबईत पार्किग कोंडीवर अखेर उतारा, महापालिकेच्या नव्या धोरणात मुबलक पार्किंगचे नियोजन
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
Mumbai transport department Japan policy
वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे धोरण राबविणार
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
64 percent of the work of widening the Mumbai Nashik highway has been completed
मुंबई नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे ६४ टक्के काम पूर्ण; मे अखेरीस पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीपुढे आव्हान

विद्यमान कॅलेंडर वर्षात टाटा मोटर्सकडून प्रवासी वाहनांच्या किमतीमध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात किमती वाढविण्यात आल्या होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने प्रवासी वाहनांच्या आयसी इंजिन असणाऱ्या श्रेणीतील वाहनांच्या किमती सरासरी १.२ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. तर १ एप्रिलपासून वाणिज्य वापराच्या वाहनांच्या किमतीत २ ते २.५ टक्के वाढ केली आहे.

Story img Loader