FSSAI राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ज्यानुसार आईच्या दुधाची विक्री केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. भारतात आईच्या दुधाची विक्री करणं हे बेकायदेशीर आहे. तरीही छुप्या पद्धतीने मानवी दुधाची विक्री केली जाते आहे असे काही प्रकार समोर आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI)दिल्या आहेत. या प्रकरणी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याच्या कठोर अमलबजावणीचे आदेश दिले आहेत तसंच ज्या संस्था किंवा आस्थापने या नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
काय म्हटलं आहे FSSAI ने?
FSSAI ने मानवी दूध विक्री, त्यावर कोणतीही प्रक्रिया करु नये हे निर्देश दिले आहेत. तसंच दूध विक्री करणाऱ्या अशा काही व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याविषयी तक्रारी मिळाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत. काही व्यापाऱ्यांनी FSSAI ने आईच्या दुधाच्या विक्रीला मान्यता दिली आहे हे सांगत विक्री केल्याचीही प्रकरणं समोर आली आहेत ज्यानंतर हे कठोर निर्देश लागू करण्यात आले आहेत.
अदाणी पोर्ट्स सेन्सेक्समध्ये प्रवेश करणार; भारतातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक कसे कार्य करतात?
२४ मे रोजी देण्यात आला आदेश
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने २४ मे रोजी हा नवा आदेश दिला आहे. अन्न नियंत्रक विभागाला देशभरातून या संबंधीच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. अनेक सरकारी संस्थांनीही याबाबत माहिती दिली आहे. FSSAI ची मान्यता असल्याचं सांगून मानवी दूध विक्री केली जात होती. त्यानंतर या FSSAI ने कठोर पावलं उचलली आहेत.
काय म्हटलंय FSSAI ने?
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील अन्न सुरक्षा आयुक्तांनी केंद्रीय संस्थेने अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. मानवी दुधाची विक्री होत असल्याचे समजल्यास तात्काळ संबंधितांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मानवी दूध आणि त्यावरील प्रक्रिया केलेले इतर पदार्थ यांची विक्री करण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंबंधीच्या अन्न सुरक्षा अधिनियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायद्यातंर्गत कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत परवानाधारक एखादी संस्था, व्यक्ती, आईचे दूध विक्री करण्याच्या व्यवसायात असल्याचे लक्षात आल्यास त्याचा परवाना रद्द करण्याची आणि त्याला पुन्हा तो परवाना न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.