शेअर बाजारात जोखीम आणि परतावा हातात हात घालून चालतात, असं अनेकदा म्हटलं जातं. हेच ब्रिद GQG ला पूर्णतः लागू होते, ज्यांनी चार महिन्यांपूर्वीपासून अदाणी समूहाचे शेअर्स खरेदी करून मोठा फायदा मिळवला आहे. GQG Partners ने गेल्या काही महिन्यांत अदाणी ग्रुपच्या शेअर्समधील आपली हिस्सेदारी दुप्पट केली आहे. शेअर्सच्या वाढीमुळे गुंतवणुकीचे आणि पर्यायानं कंपनीचे बाजारमूल्य वाढले आहे. एप्रिलपासून अदाणी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या तीव्र तेजीने GQG भागीदारांच्या गुंतवणुकीचे एकूण बाजारमूल्य सुमारे २६,००० कोटी (२५,७४६ कोटी) रुपयांवर गेले आहे.
राजीव जैन यांनी किती गुंतवणूक केली?
अमेरिकन गुंतवणूकदार राजीव जैन यांच्या जागतिक गुंतवणूक फर्मने अदाणी समूहाच्या चार समभागांमध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध शेअरहोल्डिंगनुसार या शेअर्सचे बाजारमूल्य बुधवारच्या समभागांच्या सत्रात चांगलेच वाढले. GQG ने मेमध्ये ५०० दशलक्ष डॉलर किमतीचे अदाणी समूहाचे शेअर्स विकत घेतले. जूनमध्ये अदाणी समभागांमध्ये आणखी १ अब्ज डॉलरची भर पडली. जुलैच्या सुरुवातीला GQG सांगितले की, अदाणी ट्रान्समिशनमधील त्यांची होल्डिंग ६.५४ टक्क्यांवर गेली आहे. बुधवारच्या किमतीनुसार त्या ६.५४ टक्के स्टेकची किंमत ५,८८७.३२ कोटी रुपये होती. या गुंतवणुकीमुळे शेअर्समध्ये तेजी आली आहे. अदाणी एंटरप्रायझेसबद्दल बोलायचे झाल्यास GQG पार्टनर्स इमर्जिंग मार्केट्स इक्विटी फंडाकडे १.०६ टक्के आणि गोल्डमन सॅक्स GQG पार्टनर्स इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीज फंड १.६१ टक्के असे दोघांकडे मिळून एकूण ७,४४३ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत, अशी माहिती Acorce च्या डेटावरून मिळाली आहे.
हेही वाचाः जागतिक उपासमारीच्या निर्देशांकात पाकिस्तान २६.१ वर घसरला; १२१ देशांमध्ये पाक कोणत्या स्थानी?
तसेच GQG Partners Emerging Markets Equity Fund १.३२ टक्के आणि Goldman Sachs GQG Partners International Opportunities Fund २.१८ टक्के असे दोघांकडे मिळून अदाणी ग्रीन एनर्जीमध्ये ६,१८९.४० कोटी रुपयांचा हिस्सा आहे. अदाणी पोर्ट्समध्ये दोन्ही फंडांचे ५,०२२ कोटी रुपयांचे शेअर्स होते. अंबुजा सिमेंट्स आणि अदाणी पोर्ट्सबद्दल सांगायचे झाल्यास GQG पार्टनर्स इमर्जिंग मार्केट्स इक्विटी फंडचे १,२०२ कोटी आणि १,७१० कोटी रुपयांचे शेअर्स होते.
म्युच्युअल फंडाचा वाढता हिस्सा
GQG इन्व्हेस्टमेंट्स व्यतिरिक्त म्युच्युअल फंड आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या सतत खरेदीने देखील समभागांना समर्थन मिळाले आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत म्युच्युअल फंडांनी अदाणी समूहाच्या १० पैकी ७ सूचीबद्ध कंपन्यांमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे.गेल्या दोन सत्रांमध्ये अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे, परिणामी बाजारमूल्य ५७,००० कोटी रुपयांनी वाढले आहे. बुधवारपर्यंत समूहाचे बाजारमूल्य १०.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सध्या तरी हिंडेनबर्ग संशोधनाच्या अहवालाचा प्रभाव कमी झालेला नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. १४ ऑगस्ट रोजी सेबीचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. अशा परिस्थितीत अदाणी समूहात सावधगिरीने गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.