शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीच्या काळात अब्जाधीश उद्योगपती आणि अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात गौतम अदाणी यांच्या संपत्तीत १० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सध्या गौतम अदाणी यांची एकूण संपत्ती ७०.३ अब्ज डॉलर आहे.

टॉप २० श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर झालेल्या नुकसानीमुळे गौतम अदाणी श्रीमंतांच्या टॉप २० यादीतून बाहेर होते, पण आता त्यांच्या संपत्तीच्या वाढीमुळे ते आता जगातील १५ वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

हेही वाचाः ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर ११२ हजार कोटींची थकबाकी; आतापर्यंत ७१ हून अधिक GST नोटिसा पाठवल्या

अदाणींच्या पुढे अंबानी

श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सध्या गौतम अदाणी यांच्यापेक्षा दोन स्थानांनी पुढे आहेत. या यादीत मुकेश अंबानी ९०.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १३ व्या स्थानावर आहेत.

हेही वाचाः गावागावांमध्ये आता रोजगार वाढणार, मोदी सरकारकडून मनरेगा अंतर्गत १०,००० कोटींचा अतिरिक्त निधी जारी

अदाणी समूहाचा शेअर काल २० टक्क्यांनी वाढला

यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC) च्या रिपोर्टनंतर, अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये काल म्हणजेच मंगळवारी २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. DFC अहवालात असे म्हटले आहे की, हिंडेनबर्ग रिसर्चने समूहाविरुद्ध केलेल्या कॉर्पोरेट फसवणुकीच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सिद्ध झाले आहे.

अदाणी समूहाच्या सर्व १० मार्केट लिस्टेड कंपन्यांच्या नफ्यात या आठवड्यात वाढ झाली आणि एकूण बाजार भांडवलाने (MCAP) १३ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला. मंगळवारी ५ डिसेंबर रोजी बीएसईवर अदाणी ग्रीन एनर्जीचे शेअर्स २० टक्क्यांनी वाढून १३४८ रुपयांवर, अदाणी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स १६.३८ टक्क्यांनी वाढून १०५० रुपयांवर, अदाणी टोटल गॅसचे शेअर्स १५.८१ टक्क्यांनी वाढून ८४७.९० रुपयांवर आणि अदाणी कंपनीच्या प्रमुख कंपनीचे शेअर्स १५.८१ टक्क्यांनी वधारले. एंटरप्रायझेसचे शेअर्स १०.९० टक्क्यांनी वाढून २८०५ रुपयांवर बंद झाले.

Story img Loader