मुंद्रा बंदरानंतर गौतम अदाणी भारतातील आणखी एका मोठ्या बंदरावर जोमाने काम करीत आहेत. हे बंदर केरळमध्ये बांधले जात असून, त्याच्या बांधणीचे काम जोरात सुरू आहे. हे बंदर तयार झाल्यावर ते अदाणी समूहाला नवी उभारी देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०३० पर्यंत एवढी गुंतवणूक करणार

मिंटच्या एका बातमीनुसार, अदाणी समूह या बंदरावर जोमाने काम करीत आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची योजना आहे. यासाठी अदाणी केरळमधील विझिंगम येथे बांधल्या जाणाऱ्या बंदरावर २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक २०३० पर्यंत केरळमधील विझिंजम ट्रान्सशिपमेंट टर्मिनलमध्ये केली जाणार आहे, अशी माहिती अदाणी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक करण अदाणी यांनी दिली आहे.

पुढील वर्षी कामकाज सुरू होणार

टर्मिनलला गेल्या आठवड्यात अधिकृतपणे पहिले जहाज मिळाले. झेन हुआ १५ नावाचे हे जहाज केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्वीकारले. बंदराच्या उभारणीसाठी जहाज वाहून नेणारी ही क्रेन मागवण्यात आली आहे. केरळमधील अदाणी समूहाचे हे बंदर पुढील वर्षी मे ते डिसेंबरदरम्यान सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! TCS भरती घोटाळ्यात १६ कर्मचाऱ्यांना काढून टाकले, IT कंपनीने ६ वेंडर्सवर घातली बंदी

पहिल्या टप्प्यात इतकी गुंतवणूक

अदाणी विझिंजम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ राजेश झा यांनी नमूद केले आहे की, या प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात ७,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. त्यात अदाणींच्या २५०० ते ३००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. उर्वरित गुंतवणूक केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येणार आहे. अदाणी विझिंजम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड केरळमध्ये असलेले हे बंदर बांधत आहे.

हेही वाचाः Money Mantra : SIP मधील छोटीशी गुंतवणूक नशीब बदलणार; ५०००, ८००० अन् १०००० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीत करोडपती होता येणार 

या गोष्टी बंदराला खास बनवतात

केरळमधील विझिंजम येथे उभारले जाणारे हे बंदर अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. हे बंदर पूर्ण झाल्यावर श्रीलंकेच्या कोलंबो बंदरासारख्या परदेशी ट्रान्सशिपमेंट हबवरील भारताचे अवलंबित्व कमी होणार आहे. श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात चिनी कंपन्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी होईल. विझिंजम हे भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर आहे, ज्याची नैसर्गिक खोली १८ मीटरपेक्षा जास्त आहे. मोठी जहाजे किनाऱ्यावर आणण्यासाठी हे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गापासून ते फक्त १० नॉटिकल मैल दूर आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam adani new port in kerala to invest 20 thousand crores and much more vrd