Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची केवळ भारतातच नाही तर परदेशातही जोरदार चर्चा आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत देशातील जनता ज्याप्रकारे उत्साहात आहे, त्यावरून जणू काही भारतीयांची शतकानुशतकांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. देशात ठिकठिकाणी रस्ते, घरे, दुकाने, व्यापारी प्रतिष्ठानांवर जय श्रीराम लिहिलेले झेंडे झळकावण्यात आले असून, संपूर्ण वातावरण राममय झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कार्यक्रमात उद्योग जगतही सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. अयोध्येत राम मंदिर कार्यक्रमादरम्यान देशातील सुमारे ८८० उद्योगपती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः आता टाटांच्या ‘या’ कंपनीत होणार नोकर कपात; ३ हजार जणांचे रोजगार जाणार

गौतम अदाणींनी केले ट्विट

अब्जाधीश उद्योगपती आणि अदाणी समूहाचे मालक गौतम अदाणी यांनी आज राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी ट्विट करून अयोध्या शहर आणि राम मंदिर हे देश आणि परदेशासाठी ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार बनवण्याचे आवाहन केले आहे. गौतम अदाणी लिहितात की, “आज या शुभ प्रसंगी जेव्हा अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे उघडले जात आहेत, तेव्हा ते ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार बनू या, भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सौहार्दाच्या चिरंतन धाग्यांनी समुदायांना बांधून ठेवू या…”

हेही वाचाः तीन दिवसांच्या घसरणीनंतर आता शेअर बाजार सावरला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४ लाख कोटींची वाढ

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशाला धार्मिक पर्यटन वाढवण्याची संधी मिळणार

राम मंदिरात होणाऱ्या अभिषेक सोहळ्याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार असून, अयोध्या शहर त्याच्या केंद्रस्थानी असणार आहे. विदेशी एजन्सीही अयोध्येत होणार्‍या भव्य कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवून आहेत. याची माहिती जेफरीज आशिया इक्विटी रिसर्चच्या अहवालात देण्यात आली आहे. अयोध्या कार्यक्रमाच्या आणि पवित्र शहराच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अयोध्येच्या रूपाने देशाला चांगले पर्यटनाचे आकर्षण केंद्र मिळाले असून, दरवर्षी ५ कोटींहून अधिक पर्यटकांना आकर्षित करू शकते.