नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) पहिल्या तीन तिमाहीतील ८ टक्के वाढीच्या तुलनेत विकासवेग चौथ्या तिमाहीत खुंटण्याची शक्यता असून, जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ६.२ ते ७.३ टक्के राहण्याची शक्यता बहुतांश अर्थविश्लेषकांनी व्यक्त केली आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात झालेल्या घसरणीमुळे तिमाहीतील वाढ नरमणार असून, संपूर्ण आर्थिक वर्षासाठी विकासदर ७.८ टक्के राहण्याचे अंदाजण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सरलेल्या चौथ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी येत्या ३१ मे रोजी जाहीर करणार आहे. २९ फेब्रुवारी रोजी जीडीपीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, तो दर ७.६ टक्के राहील असे नमूद करण्यात आले होते. तर सरलेल्या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये तो ८.४ टक्के, जुलै-सप्टेंबरमध्ये ८.१ टक्के आणि एप्रिल-जूनमध्ये ८.२ टक्के राहिला होता.

हेही वाचा >>> ‘एलआयसी’ आरोग्य विम्यात विस्ताराच्या तयारीत

‘इक्रा’ने विकासदर तिसऱ्या तिमाहीतील ८.४ टक्के दरावरून तो चौथ्या तिमाहीत ६.७ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. औद्योगिक क्षेत्रांच्या नफ्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे, असे ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या. तर एचडीएफसी ट्रेझरी रिसर्चने जीडीपी ६.५ टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पूर्ण वर्षासाठी तो ७.६ टक्क्यांच्या तुलनेत ७.८ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादन क्षेत्र हेच प्रमुख वाढीचे चालक असेल अशी अपेक्षा आहे. मात्र कृषी क्षेत्रात किरकोळ आकुंचन दाखविण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> छोट्या व्यावसायिकांना २,००० कोटींच्या कर्ज वितरणाचे ‘कॉसमॉस बँके’चे लक्ष्य

निवडणुकीचा परिणाम

लोकसभा निवडणुकीचाही विकासदरावर परिणाम झालेला दिसतो. ‘डीबीएस ग्रुप रिसर्च’च्या मते, निवडणुकीनंतर महागाई वाढण्याची शक्यता आहे. मात्र डीबीएस इतरांच्या तुलनेत अधिक आशादायी असून चौथ्या तिमाहीत वास्तव जीडीपी वाढ ७ टक्क्यांचे, तर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी तो ८ टक्क्यांच्या जवळ असेल, असा सकारात्मक अंदाज तिने वर्तवला आहे.

जीडीपी अंदाज (%)          चौथी तिमाही               वार्षिक (२०२३-२४)

इंडिया रेटिंग्ज                            ६.२                       ७.७

एचडीएफसी ट्रेझरी रिसर्च            ६.५                       ७.८

इक्रा                                         ६.७                       ७.८

एम्के ग्लोबल                            ६.९-७                   ७.८-८

डीएसपी ग्रुप रिसर्च                    ७                          ८

आयडीएफसी फर्स्ट बँक              ७.१                      ७.९

डॉइशे बँक                                 ७.३                       ८

कोटक महिंद्र बँक                      ६,१-६.७             ७.६-७.८

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gdp growth in march quarter likely to slow on sluggish services print eco news zws
Show comments