भारत फक्त आपल्या लोकांनाच नाही, तर संपूर्ण जगाला तांदूळ निर्यात करतो. जगातील ४० टक्क्यांहून अधिक तांदूळ व्यापारावर भारताची मक्तेदारी आहे. त्यामुळेच त्यांनी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली, तेव्हा दुबईपासून अमेरिकेपर्यंत बोंबाबोंब झाली. विशेष म्हणजे जगभरात तांदळाच्या १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत, असंही आता संयुक्त राष्ट्रांनी (UN) म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत काम करणाऱ्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) सांगितले की, जागतिक तांदूळ किंमत निर्देशांकात जुलैमध्ये २.८ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत यंदा त्यात २० पट वाढ झाली आहे.

१२ वर्षांच्या उच्च पातळीवर किंमत

गेल्या काही महिन्यांत तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे एफएओच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच्या किमती १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सप्टेंबर २०११ नंतर तांदळाचे हे सर्वाधिक भाव आहेत. तांदळाच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु भारताच्या तांदूळ निर्यात बंदीचाही जगावर खूप मोठा परिणाम झाला आहे.

हेही वाचाः ५२ सोन्याच्या बोटी, ३८ विमाने आणि शेकडो कार; जगातील सर्वात श्रीमंत राजा आहे तरी कोण? जाणून घ्या संपत्ती

कमी उत्पादन असल्यानं देशातून तांदळाच्या निर्यातीवर बंदी

यंदा एल निनोमुळे भाताचे उत्पादन घटले आहे. त्याचबरोबर भारतातील मान्सूनवरही याचा परिणाम झाला असून, त्यामुळे भात उत्पादक राज्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत देशातील तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी भारत सरकारने २० जुलै रोजी भारतातून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. भारताच्या या बंदीमुळे जगभरातील तांदळाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. भारतामुळे संयुक्त अरब अमिरातीलाही तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली आहे, कारण तेथे दक्षिण भारतीय समुदाय आणि मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचाः Money Mantra : तरुण गुंतवणूकदारांसाठी ५ आवश्यक गुंतवणुकीचे मंत्र, आजच फॉलो करा अन् बना श्रीमंत

या दोघांचे मुख्य अन्न भात आहे. तसंच भारताच्या या बंदीनंतर अमेरिकेत तांदळाबाबत नाराजी पाहायला मिळाली. भारतीयांची संख्या जास्त असलेल्या भागात सुपर मार्केटबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुकानांना ‘एका कुटुंबासाठी एक पोती तांदूळ’ असे नियम करावे लागलेत. लोकांना १० किलो तांदळासाठी अमेरिकेत तिप्पट किंमत मोजावी लागत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global rice prices hit a 12 year high as a result of india ban on rice exports vrd
Show comments