पीटीआय, नवी दिल्ली

राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधीकरणाने (एनसीएलटी) वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फर्स्ट’द्वारे (पूर्वीची ‘गो एअर’) स्वेच्छेने दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी दाखल झालेल्या अर्जावरील आदेश गुरुवारी राखून ठेवला. दरम्यान, तिने उड्डाणे रद्द करण्याची मुदत आणखी चार दिवसांनी वाढवून ९ मेपर्यंत नेली असून, विमान सेवेने १५ मेपर्यंत नवीन तिकिटांचे आगाऊ आरक्षणही थांबवले आहे.

mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
Chief Minister Devendra Fadnavis orders to complete airport works at the earliest Mumbai news
विमानतळांची कामे वेगाने पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
Marathi actress alka kubal said about behind story of these photos
अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”
Akola Municipal Corporation privatization tax collection
करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…
tmc issue show cause notices to 39 builders in thane for violating air pollution rules
३९ बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस; हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे पालन न केल्यास काम थांबवण्याचे आदेश

एनसीएलटीच्या दिल्ली खंडपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामलिंगम सुधाकर यांच्या अध्यक्षतेखालील दोनसदस्यीय पीठाने दिवसभर चाललेल्या सुनावणीचा समारोप केला. त्यादरम्यान ‘गो फर्स्ट’ने दिवाळखोरी निराकरण कार्यवाही सुरू करण्याची आणि तिच्या आर्थिक दायित्वांवर अंतरिम स्थगिती लावण्याची मागणी केली.

मात्र ‘गो फर्स्ट’ला विमाने भाडेपट्टीवर देणाऱ्या कंपन्यांनी त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली जाऊ नये अशी विनंती केली आहे. ‘गो फर्स्ट’ने निधीच्या तीव्र चणचणीमुळे ९ मेपर्यंत उड्डाणे रद्द केली आहेत. संकटग्रस्त ‘गो फर्स्ट’ने येत्या १५ मेपर्यंत तिकिटांची विक्री स्थगित केली आहे आणि भविष्यातील तारखांसाठी आगाऊ तिकिटांचे आरक्षण केलेल्या ग्राहकांना परतावा देण्यासंबंधी काम करत आहे, असे ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए)’ गुरुवारी सांगितले. डीजीसीएने गो फर्स्टला ३ मे आणि ४ मेची उड्डाणे रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस यापूर्वीच बजावली आहे.

उड्डाणे रद्द झाल्याने प्रभावित प्रवाशांना संपूर्ण परतावा दिला जाईल, अशी गो फर्स्टने ग्वाही दिली आहे. नियमांनुसार ठरलेल्या वेळेत प्रवाशांना परतावा देण्याची प्रक्रिया करण्यास डीजीसीएनेही कंपनीला सांगितले आहे.

Story img Loader