वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गो फर्स्ट एअरलाइनने अचानक दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज करून विमानांची उड्डाणे रद्द केल्याबद्दल नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचबरोबर कंपनीला तिकीट विक्री पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यास सांगितले आहे.

महासंचालनालयाने म्हटले आहे की, गो फर्स्टने अचानक विमानांची उड्डाणे रद्द केली. याचबरोबर दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला. यामुळे कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सेवा सुरक्षित, प्रभावी आणि विश्वासार्ह पद्धतीने देण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. कंपनीला उत्तर देण्यास १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. कंपनीच्या उत्तरावर तिचे कामकाज प्रमाणपत्र कायम ठेवायचे की नाही यावर निर्णय होईल.

आणखी वाचा-‘६ महिन्यांची नोटीस पूर्ण करा अन्यथा…’, नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गो फर्स्टचा दबाव

दिवाळखोरी अर्जावर लवकर निर्णय घ्या

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर कंपनीने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कंपनीने सोमवारी न्यायाधिकरणासमोर केली. मागील सुनावणीवेळी ४ मे रोजी न्यायाधिकरणाने कंपनीच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. गो फर्स्टला भाड्याने विमान देणाऱ्या कंपन्यांनी ती देणे बंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Go first ticket sales closed print eco news mrj
Show comments