येत्या पाच वर्षांत ५१५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने तामिळनाडूमध्ये कारखाना सुरू करणार आहे, अशी माहिती गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीने दिली आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ही उदयोन्मुख बाजारपेठेतील आघाडीची FMCG कंपनी आहे. तामिळनाडू राज्य सरकारबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, असे कंपनीने गुरुवारी एक्सचेंज फायलिंगद्वारे जाहीर केले. विशेष म्हणजे या कारखान्यामुळे तामिळनाडू राज्यात ४०० नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तामिळनाडू राज्य सरकारबरोबर सामंजस्य करार
सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून GCPL तामिळनाडूत एक अत्याधुनिक उत्पादन सुविधा उभारणार असून, पुढील पाच वर्षांत ५१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) च्या कार्यकारी अध्यक्षा निसाबा गोदरेज यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तामिळनाडू जवळील चेंगलपट्टू जिल्ह्यातील थिरुपोर तालुक्यात हा कारखाना स्थापन करण्यात येणार आहे. ही धोरणात्मक निवड महत्त्वाच्या दक्षिणेकडील बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देणार असून, शेजारच्या प्रदेशांमध्ये आवश्यकता पूर्ण करण्यास कटिबद्ध असणार आहे.
पुढील पाच वर्षांमध्ये ५१५ कोटी रुपयांची गुंतवणूक भारताच्या विकासाला फायदेशीर ठरणार असून, भारताच्या प्रगतीच्या प्रवासात सक्रियपणे सहभागी होण्याच्या GCPL च्या दीर्घकालीन धोरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ग्राहकांना परवडणारी, उत्तम दर्जाची आणि नावीन्यपूर्ण उत्पादने प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे. या सुविधेच्या स्थापनेमुळे आम्ही तामिळनाडूमध्ये ४०० हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करू. या सुविधेचा उद्देश सर्वसमावेशक आणि लिंग संतुलित कर्मचारी वर्ग तयार करणे आहे. आम्ही या सुविधेसाठी LGBTQ आणि अपंग (PWD) समुदायातील ५ टक्के कर्मचार्यांसह ५० टक्के महिलांना कामावर ठेवण्याची योजना आखत आहोत,” असंही गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) च्या कार्यकारी अध्यक्षा निसाबा गोदरेज यांनी सांगितले.
पर्यावरणास पूरक कारखाना असणार
गुंतवणुकीच्या कालावधीत भारतीय ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) आणि लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल डिझाईन (LEED) प्रमाणित असणारा सर्वोत्कृष्ट दर्जाचा नावीन्यपूर्ण कारखाना तयार करण्यासाठी GCPL वचनबद्ध आहे. शाश्वत विकासासाठी गोदरेजच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने नवीन प्लांट पर्यावरणास जबाबदार असलेल्या पद्धतींचे पालन करेल. हे ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करेल, कचरा कमी करण्याच्या धोरणांची अंमलबजावणी करेल, तसेच तो सोलर रूफ पॅनेलसह सुसज्ज असेल, असंही कंपनीचं म्हणणं आहे. सकारात्मक पाण्याचा समतोल साधण्यासाठी GCPL जलसंधारणाच्या उपाययोजना आणि पावसाच्या पाण्याची साठवण करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचाः ६२१० कोटींची संपत्ती कर्मचाऱ्यांना दान करणाऱ्या दानशूराविषयी जाणून घ्या
“आमच्या राज्यात ५१५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आमचा नवीन प्लांट स्थापन करण्यासाठी गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सबरोबर धोरणात्मक भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. या विकासामुळे आमच्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आपल्या राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देत आहे,” असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणालेत. तर “या अत्याधुनिक प्लांटमुळे डिलिव्हरीची वेळ जलद करण्यात आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ऑप्टिमाइझ करण्यात आणि एकूण खर्चात लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. सिंथॉल, गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम, गोदरेज सेल्फी शॅम्पू हेअर कलर आणि गुडनाइट यांसारख्या आमच्या प्रसिद्ध ब्रँड्स आणि उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी तामिळनाडूतील हा कारखाना उत्पादन केंद्र म्हणून काम करणार आहे, ज्यामुळे आमची बाजारपेठ अधिक मजबूत होईल,” असंही गोदरेजच्या ग्राहक उत्पादन लिमिटेड(GCPL)च्या एमडी आणि सीईओ सुधीर सीतापती म्हणालेत.