Gold Silver Rate Today : दसऱ्याला अनेक जण सोने खरेदी करतात. तुम्ही सु्द्धा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण सोने चांदीच्या दरात गुरुवारच्या तुलनेने थोडी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर ७८,००० वर गेले होते पण नवरात्रीमध्ये सोन्याचे दर ७६,००० आणि ७५,००० च्या खाली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या पूर्वी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला.
गुरुवारची आकडेवारी पाहता आज सोने ४५० रुपयांनी वाढले तर चांदीचा दर सुद्धा ५५० रुपयांनी वाढला आहे. आज सोने चांदीचा दर कसा आहे, हे आपण जाणून घेऊ या.

सोने चांदीचे दर (Gold Silver Rate)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,५२० रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७५,८४० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९१० रुपये आहे म्हणजेच चांदी ९०,९५० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. रविवारी चांदीचा दर ९०,४०० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७५,३९० रुपये होता.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,४५६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,७७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,४८३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,८०० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,४८३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,८०० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,४७४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,७९० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.