मुंबई : भारतातील सोन्याची मागणी विद्यमान वर्षातील जुलै-सप्टेंबर तिमाहीत १८ टक्क्यांनी वाढून २४८.३ टन झाली आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात घट केल्याने दागिन्यांची मागणी पुन्हा वाढली असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी याच तिमाहीत सोन्याची एकूण मागणी २१०.२ टन नोंदवली गेली होती. मात्र सोन्याच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने गुंतवणूकदार पुन्हा किमती कमी होतील या आशेने खरेदी लांबणीवर टाकत आहेत. संपूर्ण वर्षातील सोन्याची मागणी ७०० ते ७५० टनांच्या श्रेणीत राहण्याची शक्यता आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी कमी आहे. दिवाळीसरशी लग्नाच्या हंगामामुळे एकूण सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. आधीच्या २०२३ या संपूर्ण वर्षात सोन्याची मागणी देशांत ७६१ टन नोंदवली गेली होती.

हेही वाचा : सोन्याच्या भाववाढीमुळे ग्राहकांचा आखडता हात, धनत्रयोदशीला गेल्या वर्षाइतकीच २० टनांपर्यंत विक्री अपेक्षित

u

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत एकूण दागिन्यांची मागणी १० टक्क्यांनी वाढून १७१.६ टन झाली, जी २०२३ मध्ये याच कालावधीत ११५.७ टन होती. मूल्याच्या बाबतीत, या तिमाहीत सोन्याची मागणी ५३ टक्क्यांनी वाढून १,६५,३८० कोटी रुपयांवर गेली आहे, जी २०२३ च्या याच कालावधीत १,०७,७०० कोटी रुपये होती. चांगल्या आणि समाधानकारक मान्सूनमुळे शहरे आणि ग्रामीण भागातून मागणी लक्षणीय वाढली आहे, ज्यामुळे २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या आयातीत ८७ टक्क्यांनी जोरदार वाढ झाली. शिवाय आयात शुल्कामध्ये कपात झाल्यामुळे तस्करीचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. पुनर्वापर करण्यात आलेल्या सोन्याचे प्रमाण २३.४ टन राहिले आहे.

हेही वाचा : रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात १०२ टनांची भर

आयात शुल्कातील कपातीबरोबरच, ऑगस्टमध्ये सोन्याच्या जागतिक किमतीत वाढही सुरू झाली. तरीही तिमाहीत ग्राहकांनी सोने खरेदीचा सपाटा सुरू ठेवला. पुढील काही तिमाहींमध्ये नियोजित विवाह सोहळ्यांसाठी सोने खरेदीला चालना मिळणे अपेक्षित आहे.

सचिन जैन, प्रादेशिक मुख्याधिकारी, जागतिक सुवर्ण परिषद
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold demand in india inclined by 18 percent to 248 tons print eco news css