मुंबई: शाश्वत मूल्य असणाऱ्या सोन्याकडे सध्याच्या अनिश्चित काळात गुंतवणूकदारांचा ओढा वाढला असून, सरलेल्या ऑक्टोबरमध्ये सोनेआधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘गोल्ड ईटीएफ’मधील १,९६१ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक याचा प्रत्यय देते.सणासुदीच्या काळानंतर, तोंडावर आलेल्या लग्नसराईत सोन्याच्या किमती आणखी वाढण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी ‘गोल्ड ईटीएफ’कडे मोर्चा वळवला आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना – ‘अॅम्फी’च्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२३ मध्ये या योजनांमध्ये ८४१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मात्र यंदा त्यात मासिक आधारावर ५९ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाढत्या प्रवाहाने गोल्ड ईटीएफ फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) १२ टक्क्यांनी वाढून ऑक्टोबरअखेर ४४,५४५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा >>> म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
On Monday December 9 price of gold rise three times in four hours from morning
सोन्याच्या दरात चार तासात तीनदा बदल, हे आहेत आजचे दर…

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची कपात केल्यामुळे आणि डॉलरचे मूल्य वाढल्याने, जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती वाढल्या आहेत, असे मत मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंटचे संशोधन व्यवस्थापक हिमांशू श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. भारतातील सणासुदीच्या आणि लग्नाच्या हंगामातील मागणी लक्षात घेता सोन्याच्या किमतीत वाढ होण्याच्या अपेक्षेनेदेखील गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यास सरसावले आहेत. शिवाय, गेल्या काही वर्षांत सोन्याला एक प्रभावी गुंतवणुकीचे साधन म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे, ज्यातून अनेकांना प्रोत्साहन मिळाले आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड ईटीएफचा आवर्जून समावेश करावा, असेही श्रीवास्तव म्हणाले. आकडेवारीनुसार, गोल्ड ईटीएफ श्रेणीने ऑक्टोबरमध्ये १,९६१ कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह पाहिला. जो मागील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२४ मध्ये १,२३३ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आधीच्या ऑगस्टमध्ये १,६११ कोटी, जुलैमध्ये १,३३७ कोटी, जूनमध्ये ७२६ कोटी, मे महिन्यात ८२७ कोटी रुपयांचा ओघ राहिला आहे. त्याआधी, एप्रिलमध्ये मात्र ‘गोल्ड ईटीएफ’मधून ३९६ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. जागतिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव, जागतिक चलनवाढीचा दबाव आणि व्याजदरासंबंधाने अनिश्चितता यामुळे भांडवली बाजार अस्थिर बनला असताना, सोन्यामधील गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि महागाईवर मात करणारी ठरली आहे.

Story img Loader