पीटीआय, नवी दिल्ली

देशाच्या चालू खात्यातील तुटीवर (कॅड) परिणाम करणाऱ्या सोन्याची आयात एप्रिल ते जुलै २०२४ या चार महिन्यांदरम्यान ४.२३ टक्क्यांनी घसरून १२.६४ अब्ज डॉलरवर सीमित राहिली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे आयातीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच एप्रिल-जुलै २०२३ मध्ये १३.२ अब्ज डॉलर मूल्याचे सोने आयात करण्यात आले होते.

retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Error in gold import data due to double counting government clarification
दुहेरी मोजणीमुळे सोने आयातीच्या आकडेवारीत चूक – सरकारची स्पष्टोक्ती
shortage of Wheat flour companies
पीठ कंपन्यांना जाणवतोय गव्हाचा तुटवडा; जाणून घ्या, अन्न महामंडळाची भूमिका किती महत्त्वाची
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Gold imports down by 5 billion print eco news
सोन्याची आयात ५ अब्ज डॉलरने कमी; सरकारची नोव्हेंबर महिन्याची सुधारित आकडेवारी समोर
Hallmark certification of silver purity made mandatory soon
चांदीच्या दागिन्यांची अस्सलता तपासणे होईल सोपे; सोन्याप्रमाणेच शुद्धतेच्या हॉलमार्क प्रमाणनाची सक्ती लवकरच 
January 6 price of gold and silver has decreased
नववर्षात प्रथमच सोने-चांदीच्या दरात घट… हे आहेत आजचे दर…

एकट्या जुलै महिन्यात आयात १०.६५ टक्क्यांनी घसरून ३.१३ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ३.५ अब्ज डॉलर होती. तर एप्रिल २०२३ मध्ये आयात झालेल्या ३.११ अब्ज डॉलरवरून विद्यमान वर्षातील एप्रिल महिन्यात केवळ एक अब्ज डॉलर मूल्याचे सोने आयात करण्यात आले.

एका सराफी पेढीच्या मते, वाढलेल्या किमतीमुळे आयातीत घसरण झाली आहे. मात्र सप्टेंबरपासून देशात सणासुदीचा हंगाम सुरू होणार असल्याने आयात वाढेल. शिवाय आयात शुल्क कपात केल्याने त्याचादेखील फायदा मिळण्याची आशा आहे. गेल्या महिन्यात २३ जुलैला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सरकारने सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणले आहे.

हेही वाचा >>>स्टेट बँकेकडून १.४१ लाख कोटींची कर्जे निर्लेखित; आठ वर्षांत बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताची सोन्याची आयात ३० टक्क्यांनी वाढून ४५.५४ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. स्वित्झर्लंड हा सोन्याच्या आयातीचा सर्वात मोठा स्रोत आहे, ज्याचा वाटा सुमारे ४० टक्के आहे, त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (१६ टक्क्यांहून अधिक) आणि दक्षिण आफ्रिका (सुमारे १० टक्के) आहे. देशाच्या एकूण आयातीमध्ये मौल्यवान धातूचा वाटा ५ टक्क्यांहून अधिक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल-जुलै २०२४ या कालावधीत चांदीची आयात ६४.८४ कोटी डॉलर झाली आहे, जी मागील वर्षीच्या कालावधीत २१.४९ कोटी डॉलर होती.

व्यापार तूट वाढलेलीच

सोन्याच्या आयातीत घट होऊनही, देशाची व्यापार तूट (आयात आणि निर्यातीमधील फरक) जुलैमध्ये २३.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत तूट ८५.५८ अब्ज डॉलरपर्यंत विस्तारली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे. सोन्याची आयात घटणे देशाच्या व्यापार तुटीत घसऱणीला उपकारक ठरेल.

Story img Loader