Investment In Gold : अवघ्या काही दिवसांतच आपण २०२४ चा निरोप घेणार आहोत. अशात हे वर्ष सोन्यामध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी लाभदायी ठरले आहे. कारण २०२४ मध्ये सोन्याने २७ टक्के परतावा देत Nifty 50 व S&P 500 निर्देशांकापेक्षा उत्तम कामगिरी केली आहे.

सोन्यासाठी २०१० नंतर यंदाचे वर्ष सर्वाधिक परतावा देणारे ठरले आहे. येणार्‍या काळातही सोने आणखी महागणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत मार्केटपल्सचे विश्लेषक झैन वावदा यांच्याशी संवाद साधला आहे. याबाबत झैन वावदा म्हणाले, “२०२५ मध्ये सोन्यात अशीच रॅली येऊ शकते, परंतु ही रॅली मुख्यत्वे भू-राजकीय घडामोडींवर अवलंबून असणार आहे.”

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
On Monday December 9 price of gold rise three times in four hours from morning
सोन्याच्या दरात चार तासात तीनदा बदल, हे आहेत आजचे दर…

येत्या काळात अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा होणारा शपथविधी आणि धोरणात्मक बदलांमुळे अमेरिकन डॉलर भक्कम झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबरापासून सोन्यात काहीशी तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका सतत आयात शुल्क वाढवणार म्हणत असल्यामुळे महागाईही वाढण्याची शक्यता आहे.

गुतंवणूकीसाठी सोने सुरक्षित पर्याय

तिसर्‍या तिमाहीत सोने आणि चांदीची एकूण मागणी प्रथमच १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. या वर्षी सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांक गाठण्यात तीन महत्त्वाच्या घटकांची भूमिका आहे. यामध्ये इस्रायल आणि इराण यांच्यातील मध्य-पूर्वेतील वाढता भू-राजकीय संघर्ष, रशिया-युक्रेनमधील युद्ध आणि सीरियातील बशर अल-असद यांच्या राजवटीचा अंत, याचा समावेश आहे. या सर्व घडामोडींमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहत आहेत. परिणामी सोन्याची मागणी वाढली आहे.

…तर किंमतीत बदल दिसणार

दरम्यान जगातील अनेक देशांतील मध्यवर्ती बँका सोन्याच्या सर्वोत मोठ्या खरेदीदार ठरल्या आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमती उच्चांकावर राहिल्या आहेत. यावर्षी या मध्यवर्ती बँकांनी २०२२-२३ पेक्षा कमी सोने खरेदी केली आहे, तरीही या बँकांकडेच सोन्याचे प्रमुख खरेदीदार म्हणून पाहिले जाईल. जगातील मध्यवर्ती बँका गेल्या १५ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी खरेदी करत आहेत. पण, २०२५ मध्ये त्यांची खरेदी कमी झाली तर सोन्याच्या किंमतीत बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? चढाओढ-स्पर्धा ते सोन्या-चांदीचा वाढत राहणारा भाव… वाचा उल्हास गुप्तेंचा अंदाज

भारतात वाढू शकते सोन्याची मागणी

“सोन्याला २०२५ मध्ये आशिया खंडात इक्विटी आणि रिअल इस्टेट बाजाराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारतातील सोन्याची मागणी स्थिर राहू शकते किंवा वाढू शकते. कारण अमेरिका आयातीवर जादा कर आकरण्याची जरी धमकी देत असला तरी त्याचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे”, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.

Story img Loader