Gold Silver Today’s Price : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. गणेशोत्सवादरम्यान सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. गणेशोत्सवानंतर पु्न्हा सोने चांदीच्या दर घसरले होते. सोने चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता पण आता पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका दिवसात दहा ग्रॅम सोन्याचा दर ७३,३६० हून ७५, ४२० वर गेला आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील आजचे दर एकदा जाणून घ्या

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,१३५ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७५,४२० रुपये आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आजचे चांदीचे दर मात्र घसरले आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९१६ रुपये आहे म्हणजेच चांदी ९१६२० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. मंगळवारी चांदीचा दर ८८,२१० रुपये प्रति किलो होता.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

हेही वाचा : महागाई नियंत्रणासाठी विकासाचा बळी नको; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,०२५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,३०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,३०० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,३०० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,३०० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा : बँकांची रोख्यांवर मदार, ठेवीतील वाढ मंदावल्याने पाऊल; १.३ लाख कोटींच्या निधी उभारणीचा इक्राचा अंदाज

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

Story img Loader