Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने विक्रमी दर गाठला आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सोनं ९० हजारांवर पोहोचू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आज महाशिवरात्रीच्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सोन्यांच्या किंमती आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय कारणांवर अवलंबून असतात. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा सोने खरेदी करू इच्छित असाल तर आजच्या भावावर नक्कीच एक नजर टाका.
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात २५० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं आज 80,500 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उलाढाली आणि घटनांमुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मार्चपासून लग्नसराईंना मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे. त्यामुळं सोनं खरेदीसाठी झुंबड उडते.
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात २७० रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं ८७,८२० रुपयांवर पोहोचलं आहे. तर १८ कॅरेट सोनं २०० रुपयांनी स्वस्त झाले असून प्रतितोळा ६५,८७० रुपयांवर पोहोचले आहे. आज सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
- १० ग्रॅम २२ कॅरेट ८०,५०० रुपये
- १० ग्रॅम २४ कॅरेट ८७,८२० रुपये
- १० ग्रॅम १८ कॅरेट ६५,८७० रुपये
ग्रॅम सोनं किंमत
- १ ग्रॅम २२ कॅरेट ८,०५० रुपये
- १ ग्रॅम २४ कॅरेट ८,७८२ रुपये
- १ ग्रॅम १८ कॅरेट ६,५८७ रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
- २२ कॅरेट-८०,५०० रुपये
- २४ कॅरेट- ८७,८२० रुपये
- १८ कॅरेट- ६५,८७० रुपये
भारतात सोन्याची किंमत कशी ठरते?
दागिन्यांची किंमत शुद्धता, घडणावळ, सोन्याचे वजन आणि जीएसटी यांवर सोन्याची किंमत निश्चित केली जाते. गोल्ड असोसिएशनने ठरवून दिलेल्या दैनंदिन सोन्याच्या दरानुसार दररोज सकाळी सोने व्यापारी आणि किरकोळ विक्रेते काम करतात. फोर्ब्सच्या अहवालानुसार, प्रत्येक शहरात सोने व्यापाऱ्यांची स्थानिक संघटना असते, जी दररोज सोन्याचे दर जाहीर करते.
म्हणूनच प्रत्येक शहरात सोन्याच्या समान वजनाच्या वस्तूंच्या किमती वेगवेगळ्या असतात. संपूर्ण शहरांतील किमतींमध्ये थोडासा फरक असतो, कारण इतर काही प्रमुख घटक आहेत, जे दागिन्यांच्या किमतीवर परिणाम करतात. जसे की, मेकिंग चार्जेस, कर आणि सोन्याची शुद्धता. म्हणूनच दागिन्यांची शेवटची किंमत मोजण्यासाठी ज्वेलर्स कोणते सूत्र वापरतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे