केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये सीमाशुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर भारतात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. लग्नाचा हंगाम जवळ आल्याने सोने खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात सोन्याचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे, विशेषतः लग्न समारंभात. सोन्याच्या किमतीत नुकतीच झालेली घसरण विवाह इच्छूक जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या लग्नाच्या खर्चात भरीव बचत करण्याची उत्तम संधी देते.

जागतिक बाजारातील ट्रेंड, करन्सीमधील बदल आणि आर्थिक परिस्थिती यांसारख्या अनेक घटकांच्या प्रभावाखाली सोन्याच्या किमती सातत्याने बदलत असतात. अलीकडे या घटनांमुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ही कपात विवाहसोहळ्याची तयारी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक योग्य संधी ठरणार आहे, ज्यामुळे त्यांना अधिक परवडणाऱ्या किमतीत सोन्याचे दागिने खरेदी करता येतील.

Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
court fines matrimony portal pixabay
विवाह इच्छूक तरुणासाठी वधू शोधू न शकलेल्या मॅट्रिमोनियल पोर्टलला न्यायालयाचा दणका, ठोठावला ६० हजारांचा दंड
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?

लवकर खरेदी करा सोने

सोन्याच्या किंमती कमी होत असताना खरेदीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे सोने खरेदीसाठी पैसे असतील तर लवकरात लवकर सोने खरेदी करा. जर तुम्ही आणखी किमती होण्याची वाट पाहण्याच्या नादात खरेदी पुढे ढकल असाल तर भविष्यात या किंमती पुन्हा वाढू शकतात. कारण सोन्याचे दरामध्ये कालांतराने चढ-उतार होत असतात. मध्यपूर्वेतील तणाव आणि बांगलादेशातील संकट, आगामी महिन्यांत सोन्याच्या किमतीत संभाव्य वाढ होण्यास हातभार लावू शकतात त्यामुळे सोने खरेदीस विलंब करू नका.

हेही वाचा – Gold-Silver Price: दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; १० ग्रॅमचा भाव ऐकून गाठाल सराफा बाजार!

सोन्याच्या किमतीतील चढउतार

सोन्याचे भाव सध्या कमी असले तरी त्यात चढ-उतार होऊ शकतात. लवकर खरेदी करून, तुम्ही सध्याचे कमी दरात खरेदी करू शकता आणि भविष्यात संभाव्य दरवाढ झाल्यानंतर खरेदी टाळू शकता. लग्नाच्या तयारी दरम्यान सुरुवातीला खरेदीमुळे तुम्हाला सर्वोत्तम डिझाइन्स निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि अनेकदा शेवटच्या क्षणी खरेदी करतना होणारी ग्राहकांची गर्दी आणि जास्त किमती टाळता येईल.

हा आलेख उत्तर प्रदेशातील सोन्याच्या गेल्या 30 दिवसांच्या किमतीमधील बदल दर्शवतो (सौजन्य - FE)
हा आलेख उत्तर प्रदेशातील सोन्याच्या गेल्या 30 दिवसांच्या किमतीमधील बदल दर्शवतो (सौजन्य – FE)

Bankbazaar.com चे CEO Adhil Shetty यांनी फायनांशियल एक्स्प्रेस म्हणतात, “लग्नासाठी सोने खरेदी करताना किंमती, शुल्क आणि टॅक्स लायबलिटी (tax liability) यांची काळजीपूर्वक तुलना करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या लग्नाच्या आवश्यकतांवर आधारित बजेट आणि खरेदी सेट करणे आवश्यक आहे. दागिने खरेदी करताना, मेकिंग चार्जेस सहसा १५-२० टक्के किंवा त्याहूनही जास्त असतात आणि ३ टक्के जीएसटी देखील आकारला जातो. म्हणून, कमी दरात खरेदी केल्याने मदत होते परंतु वास्तविक किंमत आणि दीर्घकालीन दृष्टीकोन समजून घेऊनच खरेदी करा.

हेही वाचा – Dell Layoffs: AI प्रणालीचा डेल कंपनीतील कर्मचाऱ्यांना फटका? १२५०० जणांच्या नोकऱ्या गेल्या, १५ महिन्यांतली दुसरी मोठी कपात!

तुमचे बजेट ठरवा

तुमचे बजेट ठरवणे महत्वाचे आहे कारण आपल्या मर्यादेपलीकडे खरेदी करण्यात अर्थ नाही. जर तुम्ही पैसे उधार घेऊन सोने खरेदी करत असाल तर तुमच्या गरजेनुसार बजेट ठेवणे महत्त्वाचे आहे. वधू आणि वरासाठी दागिने, जवळच्या नातेवाईकांसाठी भेटवस्तू आणि इतर पारंपारिक वस्तूंसह तुम्हाला लग्नासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोन्याच्या वस्तूंची यादी करा.

सोन्याच्या किंमतींचा अंदाज घ्या

आधी सांगितल्याप्रमाणे, तुम्ही सध्याच्या सोन्याच्या किमतींबद्दल माहिती ठेवली पाहिजे. तुमच्या खरेदीची ढोबळ किंमत किती असेल आणि तुम्ही आत्ताच खरेदी करावी की तुमच्या लग्नाच्या तारखेच्या आधारावर आणखी काही काळ वाट पाहावी याची कल्पना देते. सोन्याच्या सध्याच्या किमती तपासा आणि वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दरांची तुलना करा.

सोने खरेदीसाठी पैसे जमवा

सोने खरेदी करण्यासाठी लागणारा निधी बाजूला ठेवा; हे तुम्हाला तुमचे बजेट जाणून घेण्यास आणि तुम्ही पूर्ण केल्यावर खरेदी करणे थांबविण्यात मदत करते. दागिन्यांच्या दुकानात जाऊन नवीन डिझाईन्स पाहून अधिक खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो. तुमचे बजेट तुम्हाला कुठे थांबायचे आहे हे सांगते. तुम्हाला दागिणे, नाणे, वेढणी, बॉन्ड्स अशा सोने खरेदीच्या कोणत्या श्रेणीसाठी खरेदी करायची आहे त्यानुसार पैशाचे वाटप करा. हे जास्त खर्च टाळण्यास मदत करते.

प्रतिष्ठित ज्वेलर्स निवडा

तुमच्या सोन्याच्या खरेदीची गुणवत्ता आणि सत्यता सुनिश्चित करण्यासाठी प्रतिष्ठित ज्वेलर्स निवडणे अत्यावश्यक आहे. येथे काही टिपा आहेत:

प्रमाणपत्रे तपासा: ज्वेलर्सने भारतातील BIS हॉलमार्क सारखे शुद्धतेचे प्रमाणपत्र दिले असल्याची खात्री करा.
ग्राहकांचा अभिप्राय जाणून घ्या : ग्राहकांचे मत वाचा आणि रेटिंग पहा. इतर ग्राहकांचा सकारात्मक अभिप्राय विश्वासार्ह ज्वेलर दर्शवू शकतो.
ऑफर्सची तुलना करा : वेगवेगळ्या ज्वेलर्सकडून ऑफरची तुलना करण्यास अजिबात संकोच करू नका. काही अतिरिक्त सवलत, उत्तम कारागिरी किंवा हवी तसे दागिणे बनववून देण्याची अतिरिक्त सेवा देऊ शकतात.

दर कमी असताना खरेदी करणे चांगले आहे परंतु गुणवत्ता आणि मानकांशी तडजोड करू नका. ही एक महाग मालमत्ता आहे, त्यामुळे तुम्ही किमतींवर आधारित निर्णय घेण्याची घाई करू नये. विवाहसोहळ्यांसाठी, किंमतींमध्ये वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करा जसे की शुल्क आकारणे इत्यादी कारण यामुळे तुमचा एकूण खर्च कमी होतो.