Gold Rate Today : सणासुदीचे दिवस जवळ येत असूनही सोन्याच्या भावात म्हणावी तशी वाढ पाहायला मिळत नाहीये. सोने आजकाल त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही आणि सतत घसरणीच्या श्रेणीत व्यापार करीत आहे. सोन्याबरोबरच चांदीची चमकही कमी होत आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात तसेच वायदा बाजारात सोने-चांदीमध्ये कमजोरी दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

२४ कॅरेट सोने

२४ कॅरेट सोने ५८८७१ रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे, तर काल तो ५८८८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
the survey team of the administration seized gold worth 35 lakhs In Ratnagiri
रत्नागिरीत प्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाने ३५ लाखांचे सोने पकडले
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव

२२ कॅरेट सोने

२२ कॅरेट सोने ५४१४३ रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे, तर काल तो ५४१५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

१८ कॅरेट सोने

१८ कॅरेट सोने ४४३३१ रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे तर काल तो ४४३४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

१४ कॅरेट सोने

१४ कॅरेट सोने ३४५७८ रुपये प्रति १० ग्रॅम दराने व्यवहार करत आहे तर काल तो ३४५८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,१२० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,०४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,१२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,०४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,१२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,०४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,१२० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,०४० रुपये आहे.

फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे भाव कसे होते?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सध्या सोने पुन्हा वाढले आहे आणि सोन्याचे दर हिरव्या रंगात दिसत आहेत. गोल्ड डिसेंबरसाठी फ्युचर्स १३४ रुपये म्हणजेच ०.२३ टक्क्यांच्या वाढीसह ५९३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करीत आहेत.

वायदे बाजारात चांदीचा दर कसा होता?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सध्या २८७ रुपये म्हणजेच ०.४० टक्क्यांच्या वाढीसह ७१३२४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जागतिक बाजारात सोन्याचे भाव कसे आहेत?

जागतिक बाजारपेठेत आज सोन्याचा वेगाने व्यापार होत आहे आणि १९३७.०५ डॉलर प्रति औंस दराने व्यवहार होत आहे आणि त्यात २.७० डॉलरची वाढ नोंदवली गेली आहे, जी टक्केवारीच्या दृष्टीने ०.१३ टक्क्यांची वाढ दर्शवत आहे.

जागतिक बाजारात चांदीचे भाव कसे आहेत?

आज जागतिक बाजारात चांदी ०.४० टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे आणि त्याचा दर प्रति औंस २२.८५५ डॉलरवर दिसत आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.