देशातील पाच दिवसांचा दिवाळी सण १० नोव्हेंबर २०२३ पासून म्हणजेच या शुक्रवारपासून सुरू होत आहे. धनत्रयोदशी १० नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदीला मोठा मान असतो. धनत्रयोदशीच्या आधी आज सोने आणि चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू फ्युचर्स मार्केट आणि किरकोळ सराफा बाजारात स्वस्त झाले आहेत. सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे आगामी सण आणि लग्नसराईसाठी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळत आहे. सोमवार ६ नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोने किती स्वस्त झाले?

HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ५० रुपयांनी घसरून ६१,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या व्यवहारात सोन्याचा भाव ६१,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सोने किती स्वस्त?

आज वायदा व्यवहारात सोन्याचा भाव १७४ रुपयांनी घसरून ६०,८४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १७४ रुपये म्हणजेच ०.२९ टक्क्यांनी घसरून ६०,८४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आणि त्यात १३,९७९ लॉटची उलाढाल झाली.

हेही वाचाः दिवाळीपूर्वीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, एफडीवरील व्याजदरात केली वाढ

आज चांदीचा भाव किती आहे?

आज सराफा बाजारात चांदीचा भाव ७५,२०० रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव २३.१५ डॉलर प्रति औंस होता.

हेही वाचाः Amazon Employee : ‘या’ कर्मचाऱ्याला घरून काम करण्याची सवय पडली महागात, करोडो रुपयांचे झाले नुकसान

फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये चांदी किती स्वस्त?

आज चांदीचा भाव ३४ रुपयांनी घसरून ७२,२१८ रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ३४ रुपये म्हणजे ०.०५ टक्क्यांनी घसरून ७२,२१८ रुपये प्रति किलोवर आला आणि त्यात १८,५१८ लॉटची उलाढाल झाली.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर

दिल्ली : सोने कोणत्याही बदलाशिवाय ६१७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आले आहे.
मुंबई : सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
कोलकाता : सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
चेन्नई : सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६२१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.

देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही सोन्याचे दर कमी झालेत

अहमदाबाद : सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१५२० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
बंगळुरू : सोने १५० रुपयांनी स्वस्त होऊन ६१४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
चंदीगड : सोने कोणत्याही बदलाशिवाय ६१७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आले आहे.
हैदराबाद : सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
जयपूर : सोने कोणत्याही बदलाशिवाय ६१७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आले आहे.
लखनऊ : सोने ६१७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​कोणताही बदल न करता आले आहे.
पाटणा : सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१५२० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
सूरत : सोने १७० रुपयांनी स्वस्त होऊन ६१५२० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rate today golden opportunity to buy gold before diwali gold today became cheaper by 50 rupees 06 november 2023 vrd